AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goat Dairy: एकच शेळी दूर करेल गरिबी! सर्वाधिक दूध देणारी ही बकरी ठरेल फायदेशीर

Saanen Goat Milk : शेतीसोबत जोड व्यवसाय, जोड धंदा केला तर चार पैसे गाठीशी राहतात. अनेक शेतकरी जोड धंदा करतात. त्यातून त्यांची कमाई होते. शेळी पालनातूनही फायदा होतो. जगातील सर्वाधिक दूध देणारी ही शेळी शेतकऱ्यांना मालामाल करू शकते. किती आहे तिची किंमत?

Goat Dairy: एकच शेळी दूर करेल गरिबी! सर्वाधिक दूध देणारी ही बकरी ठरेल फायदेशीर
सानन बकरी, शेळी दूग्ध व्यवसायImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 30, 2026 | 3:24 PM
Share

Saanen Goat Milk : दुग्धोत्पदानात गाय, म्हशीसोबतच शेळीचेही महत्त्व आहे. बकरीचे दूध अनेक आजारांवर गुणकारी मानले जाते. ताप आला, ऊन लागलं तर शेळीचे दूध रामबाण उपाय ठरते. आता तर सौंदर्यप्रसाधनांमध्ये शेळीच्या दुधाला मोठे महत्त्व आले आहे. शेतीसोबत अनेक शेतकरी जोडधंदा करतात. शेळीपालनाचा विचार करत असला तर शेळीची ही परदेशी जात तुम्हाला मालामाल करेल. ही बकरी जगातील सर्वाधिक दूध देणारी मानली जाते. स्वित्झर्लंडची सानन ही शेळी जगभरात प्रसिद्ध आहे.

बाजारात या बकरीची मोठी मागणी

बाजारात देशी बकऱ्या कमी दूध देतात. कधी कधी तर एक सिंगल कप दूध निघते. पण सानन जातीच्या बकऱ्यांची दूध देण्याची क्षमता सर्वाधिक आहे. त्यामुळे या जातीच्या बकरीला सर्वाधिक मागणी आहे. दूध व्यवसायासाठी आणि बचत गटासाठी ही बकरी महत्त्वाची मानली जाते. जगभरात बकरीच्या अनेक जाती आहेत. पण सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून सानन ओळखली जाते.

सानन जातीची बकरी किती लिटर देते दूध?

ही परदेशी जात, दूध देण्यात सर्वात पुढे आहे. ती रेकॉर्डतोड दूध देते. त्यामुळे इतर बकऱ्यांपेक्षा ती अत्यंत विशेष मानली जाते. जर तिची देखभाल, निगा राखली, चांगले संगोपन केले आणि चरण्याची सोय असली तर ही बकरी रोज जवळपास 3 ते 5 लिटर दूध सहज देते. वर्षभराचा हिशोब तर जवळपास 800 ते 1000 लिटर दूध देण्याच्या घरात जातो. या बकरीच्या दूध गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार मानले जाते. हे दूध घट्ट आणि पौष्टिक मानले जाते. या दुधापासून पनीर, तूप आणि खवा तयार होतो. त्याच्या चवीमुळे विक्रीही अधिक होते.

सानन बकरीची किंमत तरी किती?

भारतीय बाजारात सानन बकरीची किंमत तिचे वय, आरोग्य आणि दूध देण्याची क्षमता यावर अवलंबून असते. ही बकरी खरेदी करण्यासाठी 25000 रुपये ते 40000 रुपये मोजावे लागू शकतात. तर चांगल्या दर्जाचा बकरा खरेदीसाठी 20000 ते 35000 रुपये खर्च करावा लागतो. जर तुम्ही नोंदणीकृत उच्च दर्जाची सानन बकरी खरेदी करणार असाल तर त्यासाठी 50000 ते 60000 रुपयांपर्यंत खर्च येतो. या बकरीच्या दूधाला बाजारात मोठा भाव आहे. सानन बकरीचे दूध बाजारात 150 ते 200 रुपये लिटरप्रमाणे विक्री होते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये या बकरीच्या दुधाला चांगली मागणी असते.

Follow Us
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा