योगींचा बुलडोझर पॅटर्न, प्रयागराज हिंसाचाराच्या मास्टरमाईंडच्या घरावर चालवला बुलडोझर, अजून ३६ आरोपींची घरेही जमीनदोस्त होणार, इतर शहरांतही धास्ती

मास्टरमाईंड जावेदच्या घरातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्या आहेत. यासह काडतूसं आणि काही कागदपत्रंही मिळाली आहेत. प्रशासनाने चारे चार तासांत बुलडोझर आणि पोकलेनच्या सहाय्याने जावेदचे घर पाडले. जावेद याचे गौसनगर परिसरात अलिशान घर होते, ते पूर्णपणे तोडण्यात आले.

योगींचा बुलडोझर पॅटर्न, प्रयागराज हिंसाचाराच्या मास्टरमाईंडच्या घरावर चालवला बुलडोझर, अजून ३६ आरोपींची घरेही जमीनदोस्त होणार, इतर शहरांतही धास्ती
CM action in Prayagraj riots
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:12 PM

प्रयागराज – प्रयागराजला १० जून रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेत जावेदचे घर तोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंसाचाराचा मुख्य आरोपी जावेद मोहम्मद याच्या घराची रविवारी सकाळी पोलिसांनी छापेमारी केली. त्याच्या घरातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्या आहेत. यासह काडतूसं आणि काही कागदपत्रंही मिळाली आहेत. प्रशासनाने चारे चार तासांत बुलडोझर आणि पोकलेनच्या सहाय्याने जावेदचे घर पाडले. जावेद याचे गौसनगर परिसरात अलिशान घर होते, ते पूर्णपणे तोडण्यात आले. घर तोडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या वस्तू बाहेर नेण्याची परावनगी देण्यात आली होती. या हिंसाचार प्रकरणात अटाला मशिदीच्या मौलानांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

तोडक कारवाईसाठी कडोकोट सुरक्षा

मास्टरमाईंड जावेदचे घर तोडण्यापूर्वी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. घराच्या बाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका उभ्या होत्या. पोलिसांना या घरात काही झेंडेही सापडले आहेत. या परिसरात सुरक्षेसाठी १० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला ते ठिकाण जावेदच्या घरापासून १० किमी अंतरावर होते. या हिंसाचारानंतर ३०४ जणांना अटक करण्यात आली आहे. अजून ३६ समाजकंटकांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात येणार आहे.

इतरही शहरांत आरोपींच्या घरांवर फिरणार बुलडोझर

प्रयागराजनंतर, हिंसाचार झालेल्या उ. प्रदेशातील इतर शहरातही हीच कारवाई होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पोलीस बुडडोझरसह आरोपींच्या घरांच्या परिसरात फिरत आहेत. अनेक शहरातील आरोपी हे घर सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या घरात सध्या केवळ महिलाच आहेत. अनेक घरांना कुलूप लावून सगळेच बाहेर पळून गेल्याचीही माहिती आहे.

पैंगबर वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात हिंसाचार सुरुच

दरम्यान मोहम्मद पैंगबर वादग्रस्त प्रकरणी प्रयागराजमधून सुरु झालेला हिंसाचार अद्यापही देशभरात सुरु आहे. प. बंगालमध्ये नादियातील एका रेल्वे स्टेशनवर समाजकंटकांनी हल्ला केला. त्यावेळी स्टेशनवरील ट्रेनमध्ये तोडफोड करण्यात आली. प. बंगालमध्ये हिंसाचार झालेल्या क्षेत्रात दौरा करण्यासाठी निघालेल्या भआजपाच्या शुभेंदु अधिकारी यांना पोलिसांनी रोखले आहे.

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.