मुस्लीम तरुणी हिंदू मुलाच्या प्रेमात पडली, दोन दिवस दोघे एकत्र राहिले, तिसऱ्या दिवशी जो व्हिडीओ आला त्यानं अख्खं गाव हादरलं
मुस्लीम तरुणी हिंदू मुलाच्या प्रेमात पडली, त्यानंतर जो एक व्हिडीओ समोर आला, त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरभंगामध्ये एका हिंदू तरुणाला एका मुस्लीम तरुणीवर प्रेम झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मात्र आपल्या घरातून या लग्नासाठी विरोध होणार हे दोघांनाही चांगलंच माहीत होतं. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन दिवस ते सोबत राहिले आणि तिसऱ्या तिवशी घरी परतले. मात्र जेव्हा या गोष्टीची माहिती तरुणीच्या कुटुंबाला कळाली तेव्हा ते प्रचंड संतप्त झाले आणि या तरुणाला तालिबानी पद्धतीची शिक्षा देण्यात आली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना हायाघाट पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिलासपूर गावतील आहे. गौरव कुमार सिंह असं या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही लोक या तरुणाचे केसं कात्रीनं कापत असल्याचं दिसून आलं होतं. तसेच त्याला तोडांला काळं फासण्यात आलं होतं. हा तरुण प्रचंड घाबरलेला होता, त्याला मारहाण देखील करण्यात आली. त्याला मारहाण होत असताना या व्हिडीओमध्ये दिसत नाहीये, मात्र त्याची जी अवस्था झाली आहे, त्यावरू त्याला मारहाण झाल्याचं देखील स्पष्ट दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गौरव कुमार सिंह आणि ती मुलगी एकमेकांवर प्रेम करत होते, त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घर सोडलं. मात्र याची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली आणि त्यांनी शोध घेऊन या दोघांना पकडलं. त्यानंतर तरुणीला तिच्या घरी आणण्यात आलं, आणि या मुलाला भयानक शिक्षा दिली. तरुणीच्या कुटुंबानं या मुलाचे केस कात्रीने कापले, त्याचं मुंडण केलं, त्यानंतर त्याच्या तोंडाला काळं फासलं, त्याला मारहाण देखील करण्यात आली.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर ज्या तरुणाला मारहाण झाली तो तरुण बिलासपूर गावातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, दरम्यान आता पोलिसांनी या दोघांना पोलीस संरक्षण दिलं असून, दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.