
भारत हा देश रिकाम टेकड्या लोकांचा देश म्हटला जातो. भारतात क्रिकेट मॅच पाहाण्यासाठी लोक आपली महत्वाची कामे सोडून वेळ वाया घालवतात. या मॅचवरुन दरवर्षी होणाऱ्या वादातून अनेकांचे प्राण जात असतात. आता बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील रविवारी सायंकाळी आयसीसी फायनल टी-२० वर्ल्ड कप पाहाताना झालेल्या वादात एका १७ वर्षीय तरुणाला बोकलुन काढल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि न्युझीलंड दरम्यान खेळला जाणारा अंतिम सामना पाहाताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन एका तरुणाच्या हत्येत झाले आहे. हा प्रकार महनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जक्कोपुर गावात घडले आहे. येथे रविवारी सायंकाळी एका तरुणाची हत्या बेदम मारहाणीत झाली आहे.
वास्तविक जक्कोपूर गावात काही तरुण टीव्हीवर भारत आणि न्युझीलंडचा टी-२० मॅच पाहात होते. यावेळी भारताचा विकेट पडल्यानंतर एका तरुणाने मोठ्याने आरोळी ठोकली. त्यामुळे दुसऱ्या तरुणाला राग आल्याने त्याने जाब विचारला आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी तरुणाने कुदन कुमार याला जमीनीवर आपटले आणि त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात १७ वर्षांचा कुदन कुमार गंभीर जखमी झाला.
त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी त्याला उपचारासाठी महनार सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले.त्याची प्रकृती नाजूक असल्याचे पाहून त्याला हाजीपूर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. हाजीपूर येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला पाटणा रुग्णालयातील हलवण्यास सांगितले. पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे त्याला नेत असताना रस्त्यातच त्याचे प्राण गेले. मृताचे नाव कुदन कुमार ( १७ वर्षे ) असे असून तो जक्कोपूर येथील नगर परिषद महनारच्या वॉर्ड क्रमांक १८ येथील रहिवासी आहे.
या घटनेनंतर कुदन कुमार याचे नातेवाईक आक्रोश करत आहे. कुटुंबियांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर जक्कोपूर गावातील वातावरणात तणाव पसरला आहे. महनार येथील पोलिसांनी सांगितले की आरोपीची ओळख पटली असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली असून लवकरच त्याला अटक होईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.