अय्याशीसाठी देशाशी गद्दरी, पाकिस्तान अधिकाऱ्यांसोबत पार्टी आणि बरंच काही… भारतीय युट्यूबर पाकिस्तानी गुप्तहेर

YouTuber Jyoti Malhotra: अय्याशीसाठी ज्योती मल्होत्रा केली देशाशी गद्दरी... भारतीय युट्यूबर पाकिस्तानी गुप्तहेर, जाणून घ्या तिच्याबद्दल काही खास गोष्टी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्योती मल्होत्रा हिची चर्चा...

अय्याशीसाठी देशाशी गद्दरी, पाकिस्तान अधिकाऱ्यांसोबत पार्टी आणि बरंच काही... भारतीय युट्यूबर पाकिस्तानी गुप्तहेर
फाईल फोटो
| Updated on: May 18, 2025 | 1:49 PM

YouTuber Jyoti Malhotra: हरियाणा आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक हेरगिरीचं जाळं समोर आलं आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना देखील मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भारतातील सामान्य महिला आणि तरुणांना गुप्त माहिती पाठवण्यासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल आणि पैशाचे माध्यम बनवलं आहे. याप्रकरणी, हरियाणाच्या प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे, जे पाकिस्तानशी संबंधित कार्यकर्त्यांना भारतातीस संवेदनशील माहिती पाठवत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधून 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक दानिशशी संबंधित आहेत. दानिशा हा पाकिस्तानच्या उच्चायोगातील अधिकारी आहे.

ज्योतीने अय्याशी आणि महागडे शोक असल्यामुळे देशाचा विश्वासघा केल्याचं देखील सांगितलं जातं. गेल्या 2 वर्षांपासून ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होती… असं देखील सांगितलं जातं आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जाणून घ्या ज्योती मल्होत्रा हिच्याबद्दल काही खास गोष्टी…

ज्योतीच्या यूट्यूब चॅनेलचे 3.77 लाख सबस्क्राइबर आहेत. ती स्वतःला भटकंती करणारी म्हणून वर्णन करते. देशातील अनेक हिल स्टेशन्समध्ये चित्रित केलेले व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंटवर आहेत.

ज्योतीच्या चॅनेलवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ लक्ष वेधून घेतात. पाकिस्तानच्या तीन ट्रिपचे अनेक व्हिडिओ आहेत.

पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांशी तिची जवळीक लक्ष वेधून घेते. भारतातील एका सामान्य युट्यूबरबद्दल इतकी उत्सुकता का आहे? असा देखील प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो.

तिच्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तान दिनानिमित्त भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचे काही फोटो देखील आहेत.

हेरगिरीच्या आरोपाखाली भारताने अलिकडेच हद्दपार केलेल्या पाकिस्तानी उच्चायोगाच्या कर्मचाऱ्यासोबत ज्योतीचा फोटोही व्हायरल झाला आहे.

‘इंडियन गर्ल इन पाकिस्तान’, ‘इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर’, ‘इंडियन गर्ल ऐट कटास राज टेंपल’ आणि ‘इंडियन गर्ल राइड्स लक्जरी बस इन पाकिस्तान’ असे लिहित पाकिस्तानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिने आतापर्यंत जवळपास 487 व्हिडीओ बनवले आहेत.