AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा खास फोन अन् ‘सिक्रेट नंबर’चं गौडबंगाल, समोर आलेल्या ‘लव्ह अँगल’ने खळबळ!

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप झालेली हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे.

यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा खास फोन अन् 'सिक्रेट नंबर'चं गौडबंगाल, समोर आलेल्या 'लव्ह अँगल'ने खळबळ!
youtuber jyoti malhotra
| Updated on: May 18, 2025 | 8:24 PM
Share

Youtuber Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप झालेली हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, याच ज्योती मल्होत्राचे वेगवेगळे कनेक्शन समोर येत आहेत. ज्योती मल्होत्राच्या फोनची झडती घेतली असता एका तरुणाचे नाव समोर आले असून लव्ह स्टोरीचा एक नवा अँगल समोर आला आहे.

आधी म्हणाली माझा बॉयफ्रेंड, पण समोर आलं…

ज्योती मल्होत्राच्या फोनची झडती घेतल्यानंतर तिच्या फोनमधून सर्वाधिक वेळा जट रंधावा नावाच्या व्यक्तीला कॉल करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याच व्यक्तीने ज्योतीला सर्वाधिक वेळा कॉल केल्याचीही माहिती पुढे आलीये. टेलीग्राम तसेच स्नॅपचॅटवरही ज्योतीने याच व्यक्तीशी सर्वाधिक वेळा चॅटिंग केली आहे. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी ज्योतीला या जट रंधावा कोण आहे, असं विचारलं. सुरुवातीला ज्योतीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. जट रंधावा हा माझा बॉयफ्रेंड असल्याचं तिनं सुरुवातीला सांगितलं. मात्र अधिकाऱ्यांनी पोलिसी खाक्या दावखताच या जट रंधावाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

जट रंधावा नावाने सेव्ह केला नंबर…

जट रंधवा हा ज्योतीचा बॉयफ्रेंड नव्हे तर पाकिस्तानी इंटेलिजन्सचा वरिष्ठ अधिकारी अफसर शाकीर असल्याचं समोर आलं आहे. शाकीर या नावानं नंबर सेव्ह केला असता तर कुटुंबीयांनात सेच इतरांना माझ्यावर शंका आली असती. त्यामुळेच मी पाकिस्तानी अधिकाऱ्याचा नंबर जट रंधावा या नावाने सेव्ह केला होता, असं ज्योती मल्होत्राने सांगितलं आहे.

ज्योतीच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार….

ज्योतीने दानिश याचा मोबाईल क्रमांकदेखील अन्य नावानेच सेव्ह केला होता. ज्योतीच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार ती कोणाशीही जास्त बोलायची नाही. पोलिसांना तिच्या प्रेमप्रकरणाचीही माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्राचे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे चांगले संबंध होते. यात काही भारतीय तर काही परदेशी अधिकाऱ्यांचा समावेश होता. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिश तसेच पाकिस्तानी इंटेलिजन्शचा अधिकारी शाकीर यांचाही यात समावेश आहे. ज्योतीने कोणत्या अधिकाऱ्याला नेमकी काय माहिती पुरवली तसेच कोणत्या भारतीय अधिकाऱ्याकडून कोणती माहिती मिळवली, याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलीस तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या खात्यांचाही तपास करत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम कात्यावर पाकिस्तान उच्चायुक्तालयातील काही फोटो आहेत. ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानमधील काही व्हिडीओदेखील चांगलेच व्हायरल झाले आहेत.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.