मुंबईःअहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून आलेला, जिल्हा परिषद शाळेतून (school) शिकलेला आणि ग्रेस मार्क (Mark) नसतानासुद्धा दहावी परीक्षेत 83 टक्के घेऊन प्रथम आलेल्या वैभव गायकवाड याचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास भन्नाट आहे. यासाठी भन्नाट की, शाळेत असताना पहिला नंबरही मिळवला आहे, आणि शाळेतल्या उनाडक्या करत बारावीला त्याला 53 टक्क्यावर समाधानही मानावं लागलं आहे. म्हणून गड्यानं जिद्द सोडली नाही. त्याच जिद्दीच्या जोरावर तो आज खाकी वर्दीत आणि रुबाबात आयपीएस झाला आहे.