पुतळ्यांच्या जगात

पुतळे… पुतळे आणि पुतळे… गेल्या कित्येक वर्षापासून तीनच शब्द कानावर पडतात.. गेल्याच महिन्यात लोहपरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण झाले आणि जगात सर्वात मोठा आणि उंच पुतळा पर्यटक आणि लोकांसाठी खुला करण्यात आला.  आता काही वर्षातच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास पुतळ्यारूपी उभा राहणार आहे. चर्चा पुतळ्यांची नाही तर […]

पुतळ्यांच्या जगात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुतळे… पुतळे आणि पुतळे… गेल्या कित्येक वर्षापासून तीनच शब्द कानावर पडतात.. गेल्याच महिन्यात लोहपरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण झाले आणि जगात सर्वात मोठा आणि उंच पुतळा पर्यटक आणि लोकांसाठी खुला करण्यात आला.  आता काही वर्षातच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास पुतळ्यारूपी उभा राहणार आहे. चर्चा पुतळ्यांची नाही तर त्यामागे होणाऱ्या राजकारण आणि अर्थकारणाची आहे.

थोर आणि लढवय्या नेत्यांच्या आठवणी पुतळ्यांच्या स्वरुपात पुन्हा ताज्या करणे अयोग्य नाही. मात्र पुतळे बांधणीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी येणारा खर्च हा अवाढव्य आहे. एकीकडे देशातील नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात अपयश येत असताना, कर्जाचा बोजा  वाढतो आहे. तर दुसरीकडे मात्र अशा गोष्टींवर मोठा खर्च होत असल्यानं, तो टीकेचाही विषय बनला आहे. पुतळ्यांवर होणारा खर्च हा मोठा असून त्यावर होणारा खर्च टाळून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी हा पैसा खर्च केला जाऊ शकतो.

खरं तर भारताला एक वेगळी परंपरा आहे.. संस्कृती आहे.. इतिहास आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग जाणते. त्यामुळेच जगभरात त्यांच्या नावांचा गौरव, सन्मान केला जातो. शिवाजी महाराजांकडे तोकडे मावळे असतानाही त्यांनी आदिलशाह, निजामशाह, त्यानंतर काही अंशी इंग्रजानाही दिलेली टक्कर जगजाहीर आहे.

नुकताच गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला. येत्या काही वर्षात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही भले मोठे पुतळे उभारण्यात येणार आहेत… हे पुतळे उभारताना करोडो रुपये कर्ज काढून बांधकाम केले जाणार आहे… शिवाजी महाराज आणि बाबासाहेब दोन्ही थोर महापुरुष. मात्र त्यांनी दिलेले विचार, केलेले महान कार्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम पुतळ्यातूनच शक्य होऊ शकते असे नाही.. यापेक्षा अन्य कोणत्या मार्गाने हा उद्देश साध्य करता येईल का? तेही तपासून पाहणे गरेजचे होते.. सामाजिक-राजकीय इतिहासात मोठे योगदान देणाऱ्या महापुरुषांची आठवणी आताच्या पिढीला करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.. नव्या पिढीपुढे देशाचा इतिहास दृश्यरूपात आणायला हवा.. मात्र त्या पलीकडे जाऊन जनतेच्या समस्या त्यांना मिळणा-या सोयी-सुविधा याकडेही गांभीर्याने पाहायला हवे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेकडो पुतळे देशात पाहायला मिळतात. त्यापाठी अशा आदर्श व्यक्तींचा इतिहास, प्रेरणा आताच्या पिढीला मिळावी असा उद्देश असतो. मात्र सध्याचे चित्र पाहता त्याचे राजकारण केले जाते आहे असे दिसते.. सध्याच्या या उद्देशाची जागा राजकारणाने घेतली आहे. पुतळे न उभारण्यामागे आणखी एक कारण असू शकते, ते म्हणजे जातीय दंगल होण्यापासून रोखणे. कारण, महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याने देशात दंगली होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. अशा दंगली कोण आणि कधी घडवतात? हे सर्वांनाच माहित असेल.. वल्लभभाई पटेल यांचा भव्य असा पुतळा उभा राहिला आहे तेवढे त्यांचे व्यक्तीमत्वही उत्तुंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब या महापुरुषांच्या व्यक्तीमत्त्वही उत्तुंग असेच.. मात्र याचा अर्थ पुतळ्यांची उंची आणि आकार यावरून राजकारण व्हावे असा मुळीच नाही. पुतळे उभे करण्यापाठी काही उद्देश आहे, राजकारण नव्हे… पुतळ्यांवरुन राजकारण करूच नये, जर राजकारण आले तर वाद आणि विवाद ठरलेलेच असतात. त्यासाठी स्मारके नकोत अशी चर्चा आहे.. पुतळे आणि स्मारक उभारण्यामागे हेतू, उद्देश आसावा मात्र राजकारण नसावे.. गेल्या काही वर्षात स्मारके उभारण्याचा कल वाढला असून त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा चुराडा केला जातो आहे, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल..

सध्यातरी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये उभारण्यात आलेला पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला आहे.. स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या कामाला तब्बल 2 हजार 989 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.. त्यापाठोपाठ आता मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहे.. या पुतळ्यासाठी तब्बल 3 हजार 600 कोटी खर्च केले जाणार आहेत.. दोन टप्प्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे काम पूर्ण केले जाणार आहे.  त्यासोबत येथे कला संग्रहालय, ग्रंथालय, जीवंत देखावे दाखविण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे.

एकीकडे स्मारक उभे राहत असले, तरी गड किल्ल्यांच्या डागडुजीसाठी म्हणावा तसा निधी दिला जात नाही.. मिळालेल्या माहितीनुसार रायगडाला मिळालेले 500 कोटी सोडले तर इतर किल्ल्यांसाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही..सध्या महाराष्ट्रातील 45 किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम शासनाकडून नियोजीत असून प्रत्यक्षात याला निधी किती आणि कधी मिळणार याविषयी देखील अस्पष्टता आहे.. बहुतांश किल्ल्यांबाबत स्थानिक पातळीवर त्या-त्या ठिकाणच्या राजकीय मंडळींनी खर्च केलेला दिसतो..मात्र राज्य शासन या किल्ल्यांच्या निधीबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे पहायला मिळत आहे.. शिवरायांनी ज्या शत्रूंना नेस्तानाबूत केले, त्यासाठी ज्या गडांचा वापर केला अशा शाश्वत पुराव्यांबाबत सरकार किती गांभीर्याने विचार करतंय ते सगळ्यांनाच माहिती आहे..

इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचही स्मारक 743 कोटी खर्च करून उभारलं जाणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, इ-लायब्ररी, विपश्यना केंद्र, सभागृह असणार आहे.. उत्तर प्रदेशातच्या मायावती यांनी त्यांच्या कार्यकाळातसुमारे 700 कोटी खर्चून राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळ नावाचे स्मारक उभारले आहे.. लखनऊमध्ये मायावतींचे आणि पक्षाचे चिन्ह असणा-या हत्तींचे पुतळे तयार करण्यासाठी लाखो रूपये खर्च झाले.. मोठे पुतळे सोडले तरीही सर्वच राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं पुतळे उभे राहिले आहेत… प्रत्येक चौकाचौकात तुम्हाला पुतळे दिसतील…त्यापाठी उद्देश जरी चांगला असला, तरी त्यावर करोडो रूपये खर्च केले आहेत.. पण, याच खर्चात जर एखादं सेवाभावी रुग्णालय सुरू केले, तर अनेक गरजवंतांनी मदत होऊ शकते,हा विचारही केला जाऊ शकतो..

अनेकवेळा राजकीय हेतूपोटी पुतळे उभारले जातात. पुतळे उभे राहण्यापूर्वी त्याचे राजकारण केले जाते..मात्र असे पुतळे उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करून त्याचे जतन किती प्रमाणात केले जाते हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे..मोठा तामझाम करून उंचच उंच पुतळे बांधले जातात.. मात्र त्यानंतर देखभाल व्यवस्थित केली जात नाही.. पुतळे उभारण्यापाठी आपली भावना आणि उद्देश चांगाल आहे. मात्र पुतळ्यांना जर बोलता आले असते तर नक्कीच त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या… त्यांना उन्हा-तान्हात उभे केले जाते.. ऊन, वारा, पाऊस त्यांच्या डोक्यावर पडत असल्याची तीव्र भावना त्यांनीही व्यक्त केली असती.. तसेच पुतळे उभारण्यापेक्षा माझ्या नावाने एखादी योजना राबवून याच खर्चातून गोरगरिबांना मदत केली असती तर बरे झाले असते..समाधान वाटले असते… असेही या पुतळ्यांनी नक्कीच सांगितले आपल्याला असते.. 

– मोहन देशमुख, सिनिअर प्रोड्युसर, टीव्ही9 मराठी

(लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत) 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.