AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जी आणि शरद पवारांमध्ये राजकीय खलबतं! काँग्रेस सोडून तिसरी आघाडी की काँग्रेस सोबतच यूपीए ?

ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा अजेंडा स्पष्ट होता. मोदींविरोधात पर्यायी आघाडी तयार करण्याचा. शरद पवारांसोबत एक तास चर्चा झाल्यानंतर ममता दीदींनी पत्रकार परिषदेत ते स्पष्ट केलं. ममता बॅनर्जींचा काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न आहे, त्याची झलक त्यांच्या बोलण्यातूनही आज दिसली.

ममता बॅनर्जी आणि शरद पवारांमध्ये राजकीय खलबतं! काँग्रेस सोडून तिसरी आघाडी की काँग्रेस सोबतच यूपीए ?
शरद पवार आणि ममता बॅनर्जींची बैठक
| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 01, 2021 | 9:08 PM
Share

मुंबई : देशपातळीवरील राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना आज महाराष्ट्रात घडली. तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा अजेंडा स्पष्ट होता. मोदींविरोधात पर्यायी आघाडी तयार करण्याचा. शरद पवारांसोबत एक तास चर्चा झाल्यानंतर ममता दीदींनी पत्रकार परिषदेत ते स्पष्ट केलं. ममता बॅनर्जींचा काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न आहे, त्याची झलक त्यांच्या बोलण्यातूनही आज दिसली.

परकार परिषदेत शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. त्यावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा प्रती सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना मध्ये तोडत, शरद पवार म्हणाले की, इथे नेतृत्वाचा विषय नाही. एक स्ट्राँग अल्टरनेटिव्ह, ज्यांच्यावर या देशातील जनतेचा विश्वास असेल. भाजपला दूर करण्यासाठी मदतगार होईल, त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर निशाणा

ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्यात. मुंबईत येताच त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांशी चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवारांच्या निवासस्थानी आल्या. पण काँग्रेसच्या नेत्यांशी भेटणं त्यांनी टाळलं. उलट मुंबईतून त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. एखादा व्यक्ती काहीच करत नसेल आणि तो फक्त परदेशातच राहत असेल तर राजकारण कसं करता येईल? अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर काँग्रेस तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्डवर राहिला तर भाजपचा पराभव होईल, असं ममता दीदी म्हणाल्या.

महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला नेण्याचा डाव आहे का?

दुसरीकडे भाजपनं मात्र ममता बॅनर्जींच्या मुंबईतल्या दौऱ्यावरुन आणि आदित्य ठाकरेंसोबतच्या बैठकीवरुन आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला नेण्याचा डाव आहे का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. शरद पवांच्या उपस्थित ममता बॅनर्जी म्हणाल्या की यूपीए संपली, याचा काँग्रेसनं विचार करायला हवा का? असा सवालही आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा. याचं कारण काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच उभं राहिलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न मनात पडत असेल तर ते जनतेसमोर काय मांडणार? अशी खोचक टीका शेलार यांनी काँग्रेसवर केलीय.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचं टार्गेट फिक्स आहे, ते 2024 ची लोकसभा निवडणूक. त्यासाठीच त्यांनी भेटीसाठी सुरु करुन फिल्डिंग लावणं सुरु केलंय. आता मोदींविरोधातल्या त्या आघाडीत काँग्रेस असेल की नाही?, ही येणारी राजकीय परिस्थितीच ठरवेल.

इतर बातम्या :

ममता बॅनर्जींना काँग्रेस नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अशोक चव्हाण आणि थोरातांचा ममतांसह विरोधकांना मोलाचा सल्ला

‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का? काँग्रेसला हे मान्य आहे का?’ यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल

Follow Us
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?