AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : घरोघरी लागणार तुकाराम मुंढे यांचा फोटो, राज्यातील या ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, थेट..

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यातच आता त्यांची क्रेझ लोकांमध्ये प्रचंड बघायला मिळतंय. आता एका प्रत्येक घरात तुकाराम मुंडे यांचा फोटो असणार आहे.

Tukaram Mundhe : घरोघरी लागणार तुकाराम मुंढे यांचा फोटो, राज्यातील या ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, थेट..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 15, 2026 | 2:18 PM
Share

अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर राज्यभरात मोठ्या कारवाया सुरू केल्या. भेसळ खोरांना सळो की पळो करून तुकाराम मुंडे यांनी सोडले. मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे लोक त्यांचे काैतुक करत आहेत. अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावले जातंय. हेच नाही तर लोक त्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दीही करत आहेत. तुकाराम मुंडे कोणत्याही विभागात जावो, अशाचप्रकारची धडाकेबाज कामगिरी करताना दिसतात. मात्र, एकदा त्यांनी कारवाईला सुरूवात केली की, काही दिवसातच त्यांची बदली केली जाते. तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षात 25 बदल्या झाल्या आहेत. तुकाराम मुंडे यांची बदली झाली की, अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणतात. हेच नाही तर FDA च्या काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे यांची तक्रार केली. जास्त काम लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

तुकाराम मुंढे कोणत्याही विभागात जावो, तिथे शिस्त लावल्याशिवाय राहत नाहीत. लोकांमध्ये तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मोठी क्रेझ आहे. लोक तुकाराम मुंढे ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांना देव मानत आहेत. त्यातच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे फोटो प्रत्येक घरात लावा.. असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. थेट प्रत्येक घरात तुकाराम मुंढेंचा फोटो असणार आहे.

मुक्ताईनगरच्या कु-हा ग्रामपंचायतने आज स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामस्थांना आवाहन केले. प्रत्येक घरात तुकाराम मुंडे यांचा फोटो असावा. भेसळ माफियांकडून तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांना पाठिंबा म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने यांच्या फोटोचा अनावरण करण्यात आलं. थेट आता प्रत्येक घरात तुकाराम मुंढे यांचा फोटो असणार आहे.

महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे, ज्याच्याकडून असा निर्णय घेण्यात आला. तुकाराम मुंढे यांचे फोटो घराघरात लावा सरपंचांसह ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. तुकाराम मुंढे यांची कोणत्याही विभागात बदली झाली की, काही दिवसात त्यांच्या बदलीसाठी राजकीय नेत्यांकडून दबाव टाकला जातो. मात्र, कुठेही गेले तरीही तुकाराम मुंडे धडाकेबाज कामगिरी करतात म्हणजे करतातच.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी