Stop Food Waste Day 2022 : हा दिवस का साजरा केला जातो कारण…; अन्न नासाडीचा आरोग्यावरच नाही तर अर्थव्यवस्थेवरही होतो परिणाम
दरवर्षी 28 एप्रिल रोजी जगभरात स्टॉप फूड वेस्ट डे आयोजित करून अन्नाची नासाडी थांबविण्याासाठी लोकांना जागरूक केले जाते. खरं तर अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी जागरूकता केले गेली असली तरी अन्न फेकून देण्याच्या प्रवृत्तीने जगभर या उपसंस्कृतीचे रूप धारण केले आहे.

मुंबईः भारताची असो किंवा इतर कोणत्याही देशाची प्रगती असो, त्याला दुसरी बाजूही असते ती म्हणजे गरीबीची. (Poverty) ज्या देशात गरीबी आहे त्या देशात भूकमारीही असतेच. त्यामुळेच आज अनेक भुकवर एक उपाय सुचवला तो म्हणजे अन्नाची नासाडी करु नका. अन्नाची नासाडी (Food waste) करणे हा सामाजिक आणि नैतिक गुन्हा आहे, कारण केवळ भारतातच नाही तर जगात असे अनेक लोक आहेत की, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यामागचा खरा उद्देश असतो तो लोकांना जागरूक करणे.
फ्रान्स, इटली, कोपनहेगन, लंडन, स्टॉकहोम, ऑकलंड आणि मिलान या देशांमधून गरजूं माणसांना अतिरिक्त अन्न वाटप केले जाते. भारतातही अनेक संस्थांनी रोटी बँक (Roti Bank) सुरू केली आहे. त्याद्वारे गरजूंना अन्न वाटपाचे काम या रोटी बँकेतून केले जाते. या अशा छोट्या मोठ्या उपक्रमातूनच सर्वांनी अन्नाची नासाडी थांबवायची आहे हाच संदेश अशा कार्यक्रमातून दिला जातो.
अन्न नासाडीचा दिवस साजरा केला जातो कारण?
दरवर्षी 28 एप्रिल रोजी जगभरात स्टॉप फूड वेस्ट डे आयोजित करून अन्नाची नासाडी थांबविण्याासाठी लोकांना जागरूक केले जाते. खरं तर अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी जागरूकता केले गेली असली तरी अन्न फेकून देण्याच्या प्रवृत्तीने जगभर या उपसंस्कृतीचे रूप धारण केले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे धोरण
काही संस्थांकडून झालेल्या सर्वेक्षणावरुन असा अंदाज व्यक्त केला गेला आहे की, 2050 पर्यंत, जगभरातील अन्नाच्या कचऱ्याचे प्रमाण दुप्पट होऊ शकते. अन्नाची नासाडी अशीच सुरू राहिल्यास, 2030 पर्यंत जगभरातील भूक निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेले शून्य भूकचे उद्दिष्ट गाठणे आणखी कठीण होऊन जाणार आहे.
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम
जेवण करताना आपल्या ताटात आपण जे अन्न सोडतो त्याचे पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि रॉकफेलर फाउंडेशन यांनी केलेल्या संशोधनानुसार अन्न कचऱ्यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण आठ ते दहा टक्क्यांनी वाढते. त्याच्या उत्सर्जनामुळे एकीकडे ग्लोबल वार्मिंगची समस्या वाढत आहे, तर दुसरीकडे त्याचा अन्नधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. उत्पादित धान्य खाण्याऐवजी ते वाया घालवण्याची सवयच आपला परिसर प्रदूषित करण्याचे काम करत आहे. आणि हेच वातावरण मानवी आयुष्यासाठी हानिकारक होत आहे.
विचारसणीचा विस्तार होऊ देत
देशभरात आणि जगभरात अन्नाची नासाडी होत राहते, आणि ती दिवसेंदिवस वाढतच असते. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबवणे ही अवघड गोष्ट नाही. जगण्याच्या पद्धती आणि बदलून, माणसांच्या विचारसणींचा विस्तार करुन आपल्या सवयींमध्ये बदल करून आपण अन्नाची नासाडी थांबवली जाऊ शकते अस मत जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
