लांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा!

लांडगा, पिल्लं आणि त्यांची कृतज्ञता, जंगलातील मैत्रीचा भन्नाट किस्सा!
wolf

आजची गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही पण जंगली प्राण्यांच्या कृतज्ञतेची ही एक खरी घटना आहे. जंगली प्राण्यांची भीती कुणाला वाटत नाही, पण हे प्राणीही कुणी त्यांच्यासाठी काही केलं तर विसरत नाहीत याची प्रचिती देणारी आजची गोष्ट....!!

सचिन पाटील

|

May 28, 2021 | 3:37 PM

आजची गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही पण जंगली प्राण्यांच्या कृतज्ञतेची ही एक खरी घटना आहे. जंगली प्राण्यांची भीती कुणाला वाटत नाही, पण हे प्राणीही कुणी त्यांच्यासाठी काही केलं तर विसरत नाहीत याची प्रचिती देणारी आजची गोष्ट….!!

साल होतं १९४१….अलास्कातलं कुपरनाॅफ आयलँड. बर्फाळ प्रदेश आणि जंगलानं वेढलेला स्वर्गाहून सुंदर असलेला हा प्रदेश. एर्विन नदीमध्ये नदीतून सोनं शोधण्यासाठी जंगलात जात असतो. घनदाट जंगल सुरु होतं, अचानक एका झाडाच्या मागे काही तरी हालचाल एर्विनला दिसते, थोडं निरखून पाहिल्यानंतर एक प्रचंड मोठा लांडग्याचा पाय लोखंडी ट्रॅपमध्ये अडकल्याचं एर्विनचं लक्षात येतं. ती मादी असते.

एर्विन या लांडगा मादीला यातून सोडवायचं निश्चित करतो. तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण ती गुरगुरायला लागते. तो काही वेळ थोडं लांब जाऊन वाट पाहायला लागतो. ती मादी जोर-जोरात आवाज देणं सुरु करते. एर्विनच्या लक्षात येतं कदाचित या मादीची पिल्लं आसपास असण्याची शक्यता आहे. एर्विन त्या बर्फाळ प्रदेशात पिल्लांच्या शोधात थोडं पुढे जायला निघते तेव्हा त्या मादीचे बर्फातले ठसे आढळतात. त्या ठश्यांवरून एर्विन एका गुहेपाशी पोहोचतो.

आतमधून पिल्लांचा आवाज ऐकू येतो, तो पिल्लांना येण्यासाठी आवाज काढतो पिल्लं सुरुवातीला घाबरतात पण नंतर बाहेर येतात. तो आपले हात त्यांच्या पुढे करतो तर ती पिल्लं त्याची बोटं चोखायला सुरुवात करतात. ही पिल्लं त्याच लांडगा मादीची असल्याचं एर्विनच्या लक्षात येतं. तो ती सगळी पिल्लं सॅकमध्ये भरतो आणि त्या मादीच्या जवळ घेऊन जातो.

आपल्या पिल्लांना पाहून ती आश्चर्यचकीत होते आणि कण्हायला लागते, एर्विन सगळी पिल्लं तिच्यापाशी सोडतो. ती पिल्लं लगेचच दूध पिऊ लागतात. एर्विन एकीकडे हे सर्व पाहात असतो. आता त्याच्या पुढे प्रश्न असतो तो त्या लांडगा मादीला ट्रॅपमधून सोडवण्याचा. एर्विन पुन्हा थोडं पुढे जातो पण ती मादी आता पिल्लांमुळे आणखीनंच ऊग्र होते.

एव्हाना संध्याकाळ व्हायला लागलेली असते. एर्विन मनात आता या मादीला खायला देण्याचा विचार मनात येतो. इकडे येत असताना एक हरिण मेल्याचं पाहायल्याचं त्याला आठवतं तो तातडीनं मागे जातो, त्या हरणाचं खोडं मास घेवून पुन्हा त्या मादीपाशी येतो. शेकोटी करतो आणि बसल्या बसल्या मासाचे काही तुकडे त्या लांडगा मादीच्या दिशेने फेकायला सुरुवात करतो. तीही गेले काही दिवस भूकेलेली असते. पटापट खाऊ लागते.

आता दूध पिऊन झालेली तिची पिल्लं एर्विनकडे पुन्हा येऊ लागतात, ती मधूनच त्यांना आवाजानं रोखते पण तरीही भीती न शिवलेली ती निरागस पिल्लं त्याच्याशी खेळू लागतात. अंधार पडू लागतो. एर्विन शेकोटीजवळ एक गवताचा नैसर्गिक बेड तयार करतो. शेकोटीजवळ पहूडलेल्या एर्विनच्या मऊ मऊ जॅकेटमध्ये मग दोन पिल्लं हळूच शिरतात एर्विनच्या परवानगी विनाच. आणि तीन पिल्लं आईजवळ झोपतात.

आता ती लांडगा मादी जरा एर्विनला सरावते. सकाळ होते कडाक्याच्या थंडीत ती दोन चिमुकली एर्विनच्या जॅकेटमध्ये मस्त झोपलेली असतात. सकाळी एर्विनला जाग येते ती त्यांच्या चाटण्यानं. एर्विन त्या लांडगा मादीकडे पाहातो आता मात्र ती अजिबात गुरगुरत नाही. एर्विन पुन्हा तिला मास खायला घालतो. पिलांशी खेळतो. दुपारी पुन्हा तिचा पाय ट्रॅपमधून सोडवायसाठी पुढे सरसावले पण ती पुन्हा थोडी गुरगुरते, भीतीनं.

संपूर्ण दिवस तसाच जातो. तिची पिल्लं मात्र एर्विनसोबत आता धमाल खेळू लागतात. त्याच्या अंगाखांद्यावर चढून त्याचे केस तोंडात पकडू लागतात, त्याचं जॅकेट ओढू लागतात. तोही त्यांना मनसोक्त खेळू देतो. मधूनच तो त्यांनाही खायला देतो, ती ते पाहाते. हळू हळू ती त्याच्याकडे पाहून शेपटी हवलवायला लागते.

तिसरा दिवस उजाडतो. नेहमी प्रमाणे सकाळी सकाळी एर्विनला जाग येते ती त्याचा चेहरा चिमुकल्या पिल्लांनी जीभेनं चाटून ओला केल्यामुळे. एर्विन पुन्हा त्या पिल्लांना जवळ घेतो, कुरवाळतो. पुन्हा लांडगा मादी ते पाहते. आता मात्र ती एर्विनवर अजिबात गुरगुरत नाही. एर्विन तिला पुन्हा खायला देतो. आता मात्र एर्विनला पुन्हा घराकडे निघायचं असतं कारण आज तिसरा दिवस असतो.

एर्विन पुन्हा धाडस करुन तिच्या जवळ जातो ती मात्र आता शांत असते, एर्विन ट्रॅपमध्ये अडकलेल्या तिच्या हाताकडे आपला हात नेतो लोखंडी कडी वर उचलतो आणि तिला मुक्त करतो. क्षणात ती त्या जागेवरुन हालते, पिलांना आवाज देते पिल्लं बावरतात एकदम एर्विनला सोडून जाताना थबकतात. पण आई बरोबर निघतात जंगलाकडे. ती काही पावलं जाते पुन्हा मागे वळते एर्विनला पाहाते आपली मान थोडी खाली नेते, एक आरोळी देते जणू आभार मानावे आणि निघून जाते.

एर्विन समाधान पावलेला असतो शोधायला आलेल्या सोन्या पलीकडचं समाधान. काही दिवसांनी एर्विन सैन्यात जातो, दुसऱ्या महायुध्दात लढाईसाठी परदेशी जातो. तब्बल चार वर्षांनंतर म्हणजे १९४५ ला एर्विन पुन्हा अलास्काला परततो. आल्यानंतर काही दिवसांनी ती घडलेली घटना त्याला आठवते. सहज म्हणून त्या जागेवर जावं म्हणून एर्विन घरातून बाहेर पडतो.

ज्या ठिकाणी ती लांडगा मादी ट्रॅप झाली तिथे जातो आणि अवाक होतो. एक भला मोठा लांडगा समोर येऊन ऊभा राहतो काही अंतरावर. मोठी आरोळी ठोकतो शेपटी हालवत. एर्विन ओळखतो तीच ती मादा. आनंदून जातो. ती मादा परत एक मोठी आरोळी देते काही वेळात आणखी चार लांडगे जमा होतात. एर्विन ओळखतो ती पिल्लं आता मोठी झालेली असतात. तेही ओळखतात, शेपटी हलवतात पण कुणीही पुढे येत नाही.

काही मिनिटं एर्विन तिथेच थांबतो. पण तो जेवढा वेळ तिथे थांबतो तेवढा वेळ ती लांडगा फॅमिली तिथून हालत नाही. एर्विन पुन्हा वळतो, सुमारे शंभर मीटर जातो पण ते सर्व जण मात्र एर्विनकडे टक लावून पाहात असतात. एर्विन एकदा त्यांच्याकडे पाहून जड पावलांनी दिसेनासा होतो. मुक्या जंगली श्वापदांनी दाखवलेली ही कृतज्ञता नव्हे तर काय…??

असं म्हणतात “मारने वाले से बचाने वाला बडा होता है…!!” त्या लांडगा मादीला ट्रॅप करणारा त्या भागातला फेमस ट्रॅपर जाॅर्ज, तो ट्रॅप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅकनं मरतो त्यामुळे ती लांडगा मादी वाचते एर्विननं वाचवल्यामुळे. पुढे भयानक महायुध्दातून मात्र एर्विन सुखरुप परत येतो. निदान या घटनेपुरतं तरी म्हणता येतं की “मारने वाले से बचाने वाला बडा होता है” हे नियतीनं जाणलं असावं.

ही घडलेली घटना सत्य आहे. गोष्ट कशी वाटली ते कमेंन्टस् मध्ये नक्की कळवा.

प्रशांत कुबेर यांचे अन्य ब्लॉग 

लेडी जोचं “विमान”घर, द लिटिल ट्रम्प…!! 

रॉयल एन्फिल्ड बुलेटचं मंदिर आणि त्यामागची रंजक कहाणी 

कुलधरा, एक शापित गाव, जिथे संध्याकाळी 6 नंतर कुणीही राहू शकत नाही! 

(The female wolf , her cubs and their gratitude, the abandoned incidence of mans friendship Blog by Prashant Kuber)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें