Explained | लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध! म्हणजे नेमकं सरकार काय करणार आहे? समजून घ्या!

शरद पवारांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्याच्या सूचना पवारांनी केल्यात.

Explained | लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध! म्हणजे नेमकं सरकार काय करणार आहे? समजून घ्या!
आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही पण निर्बंध येणार, असं सरकारनं स्पष्ट केलंय..त्याचपार्श्वभूमीवर शरद पवारांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली.. या बैठकीत अनावश्यक गर्दी रोखण्याची सूचना पवारांनी केलीय..त्याचबरोबर लोकल, मॉल्स आणि रेस्टॉरंटचं काय होणार ? असेही प्रश्न जनतेच्या मनात आहेत…त्यावर सरकारचं म्हणणं काय आहे? हे नीट समजून घ्यायला हवं.

वाय बी सेंटरचे गुरुवारी दिसलेलं चित्र फार बोलकं होतं. राजेश टोपे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली. शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांनी राजेश टोपे आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली! अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्याची सूचना शरद पवारांनी या बैठकीतून केली. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होतोय. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा अॅक्टिव्ह झालेत.

शरद पवारांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्याच्या सूचना पवारांनी केल्यात. ‘कोरोनावर मुख्यमंत्री-पवारांमध्ये रोजच चर्चा होत आहे’ अशीही माहिती या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, या बैठकीनंतर पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर राजेश टोपे यांनी दिली होती. ते पाच प्रश्न नेमके कोणते, हेही समजून घेऊ.

प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?
प्रश्न क्रमांक 2 विकेंड लॉकडाऊन लागणार का?
प्रश्न क्रमांक 3 मुंबईत लोकल बंद होणार का?
प्रश्न क्रमांक 4 जिल्हांतर्गत बंदी लागणार का?
प्रश्न क्रमांक 5 मॉल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध येणार का?

या सर्व मुद्द्यांवर आरोग्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट केलंय. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या भयंकर वेगाने वाढते आहे. मात्र अद्याप येथील लोकल बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. जिल्हाबंदीविषयी विचारल्यास, राजेश टोपे म्हणाले की, सध्या तरी जिल्हाअंतर्गत बंद घालण्याची गरज वाटत नाही. विकेंड लॉकडाऊनविषयी राजेश टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेतला जाईल. हॉटेल्स, मॉल्स बंद करणार का, असा प्रश्न विचारल्यास राजेश टोपे म्हणाले, आज मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण शाळा-कॉलेज बंद करून मुले हॉटेल्स, मॉल्समध्ये फिरणार असतील तर यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. राज्यात अनावश्यक गोष्टींसाठी मेळावे, एकत्र येण्यावर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

राज्य सरकारचा लॉकडाऊनचा सध्या विचार नाही. मात्र गर्दी टाळण्यासाठी सरकार पावलं उचलणार आहे. त्यामुळं अनावश्यक गर्दी होणार नाही, याची खबरदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI