AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Week Special | चिंधीचं निस्सीम प्रेम, तिने स्वत:चा आणि पोटातल्या बाळाचाही विचार केला नाही

डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला 'जैत रे जैत' चित्रपटाची प्रेमकथा मनाला सुन्न करणारी आहे. प्रेम काय असतं, प्रेमातलं समर्पण काय असतं ते या चित्रपटात बघायला मिळतं.

Valentine Week Special | चिंधीचं निस्सीम प्रेम, तिने स्वत:चा आणि पोटातल्या बाळाचाही विचार केला नाही
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 9:48 AM

‘जैत रे जैत’ मधला नाग्या ढोलकी वाजवायचा. नाग्या हा ठाकरवाडीचा भगत. लिंगोबाच्या डोंगराला जी पोळ्यांची माळ आहे तिथे राणी माशीचं वास्तव्य आहे. तिला जर बघायचं असेल तर खूप पुण्यवान व्हावं लागेल, असं नाग्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं. नाग्या आपल्या पित्याच्या सांगण्यानुसार पुण्यवान होण्याच्या दिशेला जात होता. तो कधीच कुणाच्या अध्यात-मध्यात नसायचा. त्याने तर आयुष्यात मांसाहारही खाल्लं नाही. तो खूप भोळा आणि भला होता. पण तरीही नाग्याच्या वडिलांना सापाने डसलं आणि जीव घेतला. नाग्यावर मधमाशांनी हल्ला केला आणि त्याचा एक डोळा फुटला. नाग्या सारख्या भल्या माणसाच्या नशिबात हे भोग आले. नाग्या या घटनांमुळे पुरता खचला.

या काळात नाग्याच्या प्रेयसीने त्याला सच्ची साथ दिली. त्याची प्रेयसी म्हणजे चिंधी. तिच्या बापाने पैसे आणि बाटलीच्या मोहापाई दारूड्याशी लग्न लावून दिलेलं. पण चिंधीला ते आवडलं नाही. चिंधीने जीव ओतून पैसे गोळा केले आणि सासरवाडीच्या लोकांना पै पै परत केले. लग्न मोडलं. तिचं नाग्या या गावाच्या भगतावर जीव होता. पण ती विवाहित असल्याने नाग्याने तिला नकार दिला होता. नंतर चिंधीने नाग्याच्या प्रेमाखातर संसाराची कात टाकली. पुन्हा नाग्याकडे गेली. नाग्यावर त्यावेळी नुकताच मधमाशांनी हल्ला केलेला होता. नाग्या आतून उद्ध्वस्त झाला होता. चिंधीने नाग्याची काळजी घेतली. राणीमाशीचा बदला घेण्यासाठी साथ देण्याचं वचन दिलं. या काळात नाग्या प्रचंड नैराश्यात गेला होता. तो आपला रोष व्यक्त करण्यासाठी ढोलकी घ्यायचा आणि माळरानात जाऊन बेभान होऊन वाजवायचा.

नाग्याकडे एक कसब होतं ते म्हणजे ढोलकी वाजवायचं. त्याच्या ढोलकीच्या थापेवर आख्खी ठाकरवाडी देहभान हरपून नाचायची. नाग्या ढोलकी वाजवण्यातून व्यक्त व्हायचा. त्याचं हे वागणं चिंधीला समजायचं. चिंधीने त्याला पुन्हा नैराश्यातून बाहेर काढलं. राणी माशीचा बदला घेण्यासाठी चिंधीने स्वत:च्या प्राणाची आहुती दिली. विशेष म्हणजे त्यावेळी तिच्या पोटात बाळ होतं. नाग्याने राणीमाशीचा बदला घेतला. पण जवळचे दोन जीव पुन्हा गमवले. नाग्याला पुन्हा काहीच सुचेनासं झालं. त्याने पुन्हा ढोलकी घेतली आणि तो ती बेभान होऊन वाजवायला लागला. आपल्याकडेही अशी काहीतरी कला असायला हवी जेव्हा आपण एकटं पडू तेव्हा ती साथ देईल.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.