Sambhaji Chhatrapati: शिवबंधन बांधायला संभाजी छत्रपतींना एवढी भीती का वाटतेय? ती 5 कारणे ज्यानं त्यांचं राजकीय गणित बदलू शकतं

Sambhaji Chhatrapati: शिवबंधन बांधायला संभाजी छत्रपतींना एवढी भीती का वाटतेय? ती 5 कारणे ज्यानं त्यांचं राजकीय गणित बदलू शकतं
शिवबंधन बांधायला संभाजी छत्रपतींना एवढी भीती का वाटतेय? ती 5 कारणे ज्यानं त्यांचं राजकीय गणित बदलू शकतं
Image Credit source: tv9 marathi

Sambhaji Chhatrapati: मागच्यावेळी संभाजी छत्रपती हे राज्यसभेवर गेले होते. त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं होतं. ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. संभाजीराजेंनी भाजपात प्रवेश केला नव्हता.

भीमराव गवळी

|

May 23, 2022 | 11:58 AM

मुंबई: उद्या दुपारी 12 वाजता वर्षावर या, शिवबंधन बांधून घ्या, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना पाठवला होता. पण संभाजीराजे यांनी वर्षावर जाण्यास नकार दिला आहे. संभाजीराजे अजूनही अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. शिवसेनेकडे (shivsena) राज्यसभेवर जाण्यासाठीची सर्वाधिक मते आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आमदारही शिवसेना देईल त्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडे फक्त 27 मते आहेत. त्यांना आणखी 15 मतांची बेगमी करणं कठिण होणार आहे. असं असताना शिवसेनकडून राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सोपा असूनही संभाजीराजे शिवबंधन का बांधत नाहीत? असा सवाल केला जात आहे. शिवबंधन न बांधण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजप दुखावली जाऊ शकते

मागच्यावेळी संभाजी छत्रपती हे राज्यसभेवर गेले होते. त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं होतं. ते राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. संभाजीराजेंनी भाजपात प्रवेश केला नव्हता. तरीही भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. आता जर शिवसेनेत प्रवेश केला तर भाजप कायमचा दुखावला जाईल. त्यामुळे अडचणी वाढू शकतात. म्हणूनच संभाजीराजे शिवसेनेत जाण्यात टाळत असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठा संघटना नाराज होऊ शकतात

संभाजी राजे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी त्यांनी विविध मराठा संघटनांना एका झेंड्याखाली आणलं. या संघटनांमधील लोक विविध पक्षांना मानणारे आहेत. असं असताना संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला तर मराठा संघटना नाराज होण्याची शक्यता आहे.

छत्रपतींचे वंशज शिवसेनेत असा मेसेज

संभाजी छत्रपती यांनी आतापर्यंत कुणाचं नेतृत्व स्वीकारलेलं नाही. त्यांनी आपलं व्यक्तीमत्त्व स्वतंत्र ठेवलं आहे. छत्रपतींचा वशंज कुणाचा तरी कार्यकर्ता अशी इमेज त्यांनी होऊ दिली नाही. भाजपने राज्यसभेवर पाठवलं तेव्हाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. आता शिवसेनेत प्रवेश केल्यावर एका खासदारकीसाठी संभाजीराजे शिवसेनेत गेल्याचा मेसेज जाईल. छत्रपतींचे वशंज शिवसेनेत असल्याचा प्रचार होईल. त्यामुळेही शिवसेनेत प्रवेश करण्यास त्यांनी नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.

एका पक्षाचे म्हणून शिक्का बसणार

संभाजीराजेंनी आपलं सामाजिक आणि राजकीय व्यक्तीमत्त्व सर्वसमावेशक असं ठेवलं आहे. मराठा आंदोलनाचं नेतृत्व करताना ओबीसी आरक्षणाचीही ते सातत्याने बाजू घेत होते. तसेच बहुजनांच्या हिताबाबातही संभाजी राजे सातत्याने बोलत होते. त्यामुळेच त्यांनी आता कोणत्याही पक्षात न जाता स्वराज्य या संघटनेची स्थापना केली. आपलं स्वतंत्र राजकारण असावं, आपल्या भूमिकेला पुढे नेता यावं यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली. मात्र, आता शिवसेनेत प्रवेश केल्यास एका पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावर शिक्का बसू शकतो.

हे सुद्धा वाचा

‘स्वराज्य’ बहरण्याआधीच कोमेजणार

मराठा आरक्षण आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर ही शक्ती संघटीतच राहावी आणि मराठा समाजाचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी स्वराज्य या पक्षाची स्थापना केली. या संघटनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. असं असताना शिवसेनेत प्रवेश केल्यास ही संघटना गुंडाळून ठेवावी लागेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नवा पक्ष स्थापन केला होता. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्ष गुंडाळावा लागला होता. जे राणेंच्या बाबतीत झालं तेच आपल्या बाबत होऊ नये. बहरण्याआधी स्वराज्य संघटना कोमेजू नये म्हणूनही संभाजी छत्रपती यांनी आपण लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें