‘महाभारत’मधील ती खास भूमिका, 1500 ऑडिशननंतर या अभिनेत्रीची निवड, सध्या जगते असं आयुष्य

महाभारत मालिकेतील प्रसिद्ध पात्र, ज्यासाठी 1500 मुलींचे घेण्यात आलेले ऑडिशन. मात्र, शेवटी या अभिनेत्रीची झालेली निवड. जी बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री.

| Updated on: Apr 23, 2026 | 3:57 PM
1 / 5
भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात महाभारत आणि रामायण हे दोन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या मनावर खोलवर कोरल्या गेल्या आहेत. विशेषतः बी. आर. चोपड़ा यांनी निर्मित केलेल्या ‘महाभारत’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांसाठी अमर ठरले.

भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात महाभारत आणि रामायण हे दोन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या मनावर खोलवर कोरल्या गेल्या आहेत. विशेषतः बी. आर. चोपड़ा यांनी निर्मित केलेल्या ‘महाभारत’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांसाठी अमर ठरले.

2 / 5

या मालिकेतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक म्हणजे ‘द्रौपदी’. या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री निवडणे हे निर्मात्यांसाठी मोठे आव्हान होते. कारण कथानकाचा गाभा या पात्राभोवती फिरत होता. यासाठी तब्बल 1500 मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. त्यातून फक्त तीन अभिनेत्रींची अंतिम निवड करण्यात आली.

3 / 5

या तिघांमधून अखेर बंगाली अभिनेत्री रूपा गांगुली यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने ‘द्रौपदी’ या भूमिकेला एक वेगळी उंची दिली. त्यांच्या अभिनयामुळे हे पात्र टीव्ही इतिहासातील सर्वात आयकॉनिक भूमिकांपैकी एक बनले.

4 / 5

बी. आर. चोपडा यांना अशी अभिनेत्री हवी होती जी द्रौपदीचा आत्मसन्मान, संताप आणि संवेदनशीलता प्रभावीपणे साकारू शकेल. रूपा गांगुली यांनी स्क्रीन टेस्टमध्ये या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या की त्या या भूमिकेसाठी परफेक्ट ठरल्या.

5 / 5

‘द्रौपदी’ ही भूमिका रूपा गांगुली यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. विशेष म्हणजे, अंतिम तीन अभिनेत्रींच्या यादीत जूही चावलाचेही नाव होते. मात्र त्या काळात तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळत होत्या. त्यामुळे तिने ‘महाभारत’ मालिकेला नकार देत बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us