
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. अयोध्येत नवव्यांदा दीपोत्सव साजरा करण्यात आला. राम की पैडी आणि सरयू नदीच्या काठावर 26 लाखांपेक्षा प्रज्वलित अधिक दिवे लावण्यात आले. हा एक नवा विश्वविक्रम आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दीपोत्सवासाठी अयोध्येत आले होते. मुख्यमंत्री योगी यांनी पुष्पक विमानासारख्या हेलिकॉप्टरमधून रामकथा पार्क हेलिपॅडवर राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या प्रतिमांचे स्वागत केले.

या खास दीपोत्सवाच्या कार्यक्रमात शरयू नदीच्या काठावर राम की पैडी येथे लेसर आणि लाईट शो आयोजित करण्यात आला होता. दिवे आणि रंगीबेरंगी लाईट शो ने शरयू काठावर वेगळीच ऊर्जा संचारली होती.

शरयू काठावर नागरिकांना हा दीपोत्सव आणि लाईट शो पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी ड्रोन वापरून दिवे मोजल्यानंतर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने नवीन विक्रमाची घोषणा केली. स्वप्नील डांगरेकर आणि निश्चल बारोट यांनी नवीन विक्रमाची घोषणा केली.