KKHH : ‘कुछ कुछ होता है’ला 28 वर्ष पूर्ण ! शाहरुख, काजोल की राणी? सर्वाधिक फी कोणी घेतली?

Kuch Kuch Hota Hai : राहुल, अंजली आणि टीना.. हे त्रिकूट तर सर्वांनाच आठवत असेल. हा चित्रपट रिलीज होउऊन तब्बल 28 वर्ष झाली आहेत. या चित्रपटासाठी सर्वात जास्त फी कोणी घेतली ?

| Updated on: Oct 17, 2026 | 5:48 PM
1 / 5
बॉलीवूडमधील ऑल-टाइम ब्लॉकबस्टर फिल्म  म्हणजे'कुछ कुछ होता है'. हा चित्रपट रिलीज होऊन तब्बल 28 वर्ष झालीत. 16 ऑक्टोबर 1998 साली हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला, आणि बॉक्स ऑफीसवरचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले. या चित्रपटाने भारतीय सिनेमातीतल प्रेम आणि मैत्रीची भाषाही बदलली. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका होती. त्या तिघांपैकी सर्वात जास्त फी कोणाला मिळाली होती ?

2 / 5

करण जोहरने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट यश जोहर यांनी प्रोड्यूस केला. तो त्या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.या चित्रपटात 'राहुल'च्या डॅशिंग आणि कूल अवतारात शाहरुख खान दिसला. तर काजोलने 'अंजली' ची आणि राणी मुखर्जीने 'टीना'ची स्टायलिश भूमिका साकारली.

3 / 5

खरं तर सलमान खानने या चित्रपटात ‘अमन’च्या भूमिकेत कॅमिओ केला. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. तसेच अनुपम खेर, फरीदा जलाल, अर्चना पूरण सिंह आणि लहान अंजलीच्या भूमिकेत दिसलेली सना सईद यांनीही आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. चित्रपटाच्या यशासोबतच त्यातील कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचीही नेहमीच चर्चा होत असते.

4 / 5

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात राहुलची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला सर्वाधिक म्हणजेच 1 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. तर अंजलीच्या अजरामर भूमिकेसाठी काजोलला 30 लाख रुपये देण्यात आले होते.

5 / 5

दुसरीकडे, टीना ही भूमिका साकारणाऱ्या राणी मुखर्जीची भूमिका चित्रपटात लवकरच संपली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तिने 13 लाख रुपये मानधन घेतलं होतं. या चित्रपटाला जतिन-ललित या संगीतकार जोडीने संगीत दिलं, तर समीर यांनी गाणी लिहिली होती ‘कुछ कुछ होता है’, ‘कोई मिल गया’, ‘ये लड़का है दीवाना’ यांसारखी चित्रपटातील सर्वच गाणी आजही प्रेक्षकांच्या आवडत्या गाण्यांच्या यादीत कायम आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us