गाणं पाहिजे तर असं, 90 च्या दशकापासून क्रेझ कायम, एकदा ऐकलं तरी लोक…

90 च्या दशकातील सर्वात रोमँटिक आणि त्यामधील रोमान्सने गाण्याला बनवलं होतं अधिकच सुपरहिट. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळत हे गाणं.

| Updated on: May 27, 2026 | 11:58 AM
1 / 5
1990 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांइतकीच गाणीही लोकप्रिय होत होती. चित्रपटातील रोमँटिक गाणी, सुंदर लोकेशन्स, कलाकारांची अप्रतिम केमिस्ट्री आणि मनाला भिडणारे बोल यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायचे.

1990 चं दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपटांइतकीच गाणीही लोकप्रिय होत होती. चित्रपटातील रोमँटिक गाणी, सुंदर लोकेशन्स, कलाकारांची अप्रतिम केमिस्ट्री आणि मनाला भिडणारे बोल यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध व्हायचे.

2 / 5

त्या काळातील अनेक गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. सोशल मीडियापासून यूट्यूबपर्यंत ही गाणी आजही तितकीच ट्रेंड होताना दिसतात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 'घूँघट की आड़ से दिलबर का' हे गाणं 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक गाण्यांमध्ये याची गणना केली जाते.

3 / 5

हे गाणं आजही भारतीय लग्नसमारंभ, साखरपुडा, संगीत कार्यक्रम आणि विविध कौटुंबिक समारंभांमध्ये मोठ्या आवडीने ऐकायला मिळतं. हे गाणं प्रदर्शित होताच ते प्रचंड लोकप्रिय झालं आणि विशेषतः प्रेमी युगुलांमध्ये त्याची मोठी क्रेझ पाहायला मिळाली.

4 / 5

या गाण्यातील रोमँटिक सादरीकरण, सुंदर दृश्यं आणि कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. आमिर खान आणि जूही चावला यांची जोडी त्या काळातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जात होती. या गाण्यात दोघांनी साकारलेला रोमँटिक अंदाज आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

5 / 5

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलं यश मिळवलं होतं. भारतासोबतच परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे, या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us