
कधी काळी महिला क्रिकेटला फारसं महत्व दिलं जात नव्हतं. दिवस उलटले तसे महिला क्रिकेटला महत्व प्राप्त झालं आणि त्याची क्रेजही वाढत गेली. महिला क्रिकेटर्सचा फॅन बेसही वाढला. लोक महिला क्रिकेटर्सच्या खेळासह त्यांच्या सुंदरतेचेही दिवाने आहेत. आपण अशाच काही निवडक महिला क्रिकेटरबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्या सुंदरतेचे लाखो दिवाने आहेत. (File Pic)

भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर स्मृती मानधनाचं नाव या यादीत येतं. स्मृतीच्या सुंदरतेचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. 2017 च्या एकदिवसीय विश्वचषकातील एका मॅचमध्ये स्मृतीने शानदार खेळ केला होता. मैदानावर तिने हेल्मेट काढल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या खेळासह सुंदरतेचीही जोरदार चर्चा सुरु झाली होती. भारताच्या या खेळाडूने आतापर्यंत 84 टी-20 सामने, 71 एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामने खेळले आहेत. (Pic credit Smriti Mandhana Insta)

पाकिस्तानची कायनात इम्तियाज एक उत्तम ऑलराऊंडर आहे. आपल्या उत्तम खेळासह कायनात तिच्या सुंदरतेमुळेही चर्चेत आहे. त्यामुळेच तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 156K आहे. तिने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 15 एकदिवसीय तर 16 टी-20 सामने खेळले आहेत. (Pic Credit Kainat Imtiaz Insta)

इंग्लंडची सारा टेलरही या यादीतून वेगळी राहू शकत नाही. या खेळाडूने आपल्या सुंदरतेनं अनेकांना घायाळ केलंय. सारा टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतलाय. साराने इंग्लंडसाठी 10 कसोटी, 126 एकदिवसीय तर 90 टी-20 सामने खेळले आहेत. (Pic Credit Sarah Taylor Insta)

ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरी देखील सुंदरतेत कमी नाही. एलिसाने आपल्या खेळाने क्रिकेटविश्वास वेगळं स्थान निर्माण केलं आहे. खेळासोबत तिने आपल्या सुंदरतेनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. एलिसाने ऑस्ट्रेलियासाठी 10 कसोटी सामने, 128 एकदिवसीय सामने आणि 126 टी-20 सामने खेळले आहेत. (Pic Credit Ellyse Perry)

आयरलँडची सेसिला जोएसेही आपल्या सुंदरतेनं जगभरात प्रसिद्ध आहे. आयरलँडची ओपरन जोएसेच्या कुटुंबाचं क्रिकेटशी नातं राहिलं आहे. तिचे भाऊ-बहिणनही क्रिकेट खेळतात. आपल्या देशासाठी या खेळाडूने 57 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. (Pic Credit Twitter)