7 वर्षे या गाण्याला मिळाला नकार, शम्मी कपूर यांनी ऐकताच घेतलं चित्रपट, ठरलं प्रचंड ब्लॉकबस्टर, आजही प्रत्येक कपलचं आवडतं

प्रत्येक तरुणांचं आवडतं गाणं, ज्याला 7 वर्षे अनेकांनी केलं रिजेक्ट. मात्र, शम्मी कपूर यांनी ऐकताच चित्रपटात घेतलं आणि ठरलं प्रचंड सुपरहिट. आजही प्रत्येक कपलचं आवडतं आहे गाणं.

| Updated on: May 16, 2026 | 4:17 PM
1 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत, जी रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. पण काही गाण्यांचा प्रवास मात्र खूप संघर्षमय असतो. अनेकदा संगीतकारांना स्वतःच्या धूनवर पूर्ण विश्वास असतो पण कलाकार किंवा निर्माते ती धून स्वीकारत नाहीत.

2 / 6
असाच एक किस्सा आहे हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार गाणं ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ याचा. तब्बल 7 वर्षे हे गाणं एका चित्रपटातून दुसऱ्या चित्रपटात फिरत राहिलं, मोठमोठ्या सुपरस्टार्सनी ते नाकारलं, पण अखेर रिलीज झाल्यावर हेच गाणं इतिहासात अजरामर ठरलं.

3 / 6
या गाण्याचा प्रवास 1961 मध्ये सुरू झाला. त्या काळात देव आनंद आणि आशा पारेख यांचा ‘जब प्यार किसी से होता है’ हा चित्रपट तयार होत होता. चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन संगीत देत होती. गीतकार हसरत जयपुरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते, तर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी ते आपल्या आवाजात रेकॉर्डही केले होते.

4 / 6
संगीतकारांना खात्री होती की हे गाणं प्रचंड लोकप्रिय होईल. मात्र चित्रपटाचे नायक देव आनंद यांना ही धून थोडी जास्त आवडली नाही. त्यांच्या मते हे गाणं त्यांच्या स्क्रीन इमेजला सूट होत नव्हतं. परिणामी, गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.

5 / 6
पहिल्या नकारानंतरही शंकर-जयकिशन यांनी हार मानली नाही. काही वर्षांनी 1966 मध्ये राजेंद्र कुमार यांच्या ‘सूरज’ या चित्रपटासाठी पुन्हा ही धून समोर आणण्यात आली. संगीतकारांना वाटलं की यावेळी तरी गाण्याला संधी मिळेल. पण पुन्हा एकदा निराशा पदरी पडली. अशा प्रकारे दुसऱ्यांदाही हे गाणं रिजेक्ट झालं.

6 / 6
यानंतर 1968 मध्ये ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या चित्रपटात शम्मी कपूर मुख्य भूमिकेत होते. शंकर-जयकिशन यांनी त्यांना ही धून ऐकवली आणि यावेळी नशीब बदललं. शम्मी कपूर यांना गाणं पहिल्याच वेळी प्रचंड आवडलं. त्यांनी तात्काळ हे गाणं चित्रपटात ठेवण्यास होकार दिला. त्यानंतर गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आणि रिलीज होताच ते देशभर गाजलं.

Follow Us