इतकं सुंदर गाणं की 69 वर्षांपासून सुपरहिट, कोणीच अर्धवट सोडत नाही, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
दिलीप कुमार यांचं 69 वर्षांपूर्वीचं प्रचंड चर्चेत असणारं गाणं, जे महाभारतच्या दिगर्दशकांनी त्यांच्या चित्रपटात वापरलं. प्रदर्शित होताच ठरलं प्रचंड सुपरहिट. लहान मुलगा देखील गुणगुणतो.

बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागवणारी ही गाणी आवर्जून ऐकली जातात.

यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘ये देश है वीर जवानों का’. तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. हे गाणं 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नया दौर’ या गाजलेल्या चित्रपटातील आहे.

या चित्रपटात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘महाभारत’ मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले बी. आर. चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा अख्तर मिर्झा यांनी लिहिली होती.

‘नया दौर’ची कथा शंकर आणि कृष्णा या दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. दोघेही रजनी नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडतात. मैत्री, प्रेम आणि बदलत्या काळातील संघर्ष यामुळे कथेला वेगळे वळण मिळते.

या चित्रपटातील ‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाले. आजही देशभक्तीपर गाण्यांच्या यादीत या गाण्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘नया दौर’ हा 1957 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.