
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य प्रशासनातील सर्व प्रधान सचिव तसेच महत्वाचे अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन उजळून निघाले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे येथील विधान भवन येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

NW फ्रंटियरच्या ITBP जवानांनी लेह, लडाख येथे 14,000 फूट उंचीवर तिरंगा फडकावला.

भारतीय क्रिकेट संघाचा कोच गौतम गंभीर याने 'हर घर तिरंगा ' कँपेनअंतर्गत दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

प्रसिद्ध कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरी बीचवर वाळूतून शिल्प साकारत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.