
अभिनेता आमिर खान नुकताच 'मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिव्हल'ला उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसुद्धा होती. या कार्यक्रमातील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फेस्टिव्हलमध्ये आमिर आणि गौरी पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. आमिरने काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर शाल परिधान केला होता. तर गौरीने फ्लोरल सिल्क साडी नेसली होती.

गर्लफ्रेंडचा गौरीचा हात हातात घेऊन आमिरने यावेळी फोटोसाठी पोझ दिले. या दोघांच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी या दोघांसोबत चिनी अभिनेता शेन टेंग आणि मा ली हे दोघंसुद्धा होते.

गेल्या 25 वर्षांपासून आमिर आणि गौरी एकमेकांना ओळखत असून गेल्या दीड वर्षापासून ते डेट करत आहेत. या दोघांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. गौरी ही बेंगळुरूची असून तिथे तिचं सलॉन आहे.

गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे. तिचं मुंबईतही 'बी ब्लंट' नावाने सलॉन आहे. तर आमिरला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि दुसऱ्या पत्नीसोबत एक मुलगा आहे.