Abhishek Sharma : 93 चौकार, 71 षटकार अन् 975 धावा; हैदराबादच्या मैदानावर अभिषेक शर्मा कोणता विक्रम करणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-20 सामना 14 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

| Updated on: Oct 13, 2026 | 2:45 AM
1 / 5
हैदराबादमध्ये विक्रम करण्याची संधी: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-20 सामना 14 ऑक्टोबर 2026 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

हैदराबादमध्ये विक्रम करण्याची संधी: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी-20 सामना 14 ऑक्टोबर 2026 रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

2 / 5

000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 25 धावांची गरज: अभिषेकने या मैदानावर टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 डावांत 975 धावा केल्या आहेत. आणखी 25 धावा केल्यास त्याच्या नावावर या मैदानावर 1000 टी-20 धावा पूर्ण होतील.

3 / 5

शिखर धवननंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय: हैदराबादच्या या मैदानावर टी-20 क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा शिखर धवन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. अभिषेकने 25 धावा केल्यास तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

4 / 5

स्ट्राइक रेट 211.03: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अभिषेकचा टी-20 क्रिकेटमधील स्ट्राइक रेट 211.03 इतका आहे. त्याने या मैदानावर 2 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.

5 / 5

चौकार आणि षटकारांची आतषबाजी: अभिषेकने हैदराबादच्या मैदानावर आतापर्यंत 93 चौकार आणि 71 षटकार मारले आहेत. त्यामुळे चौथ्या टी-20 सामन्यात त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us