Chanakya Niti : आयुष्यात कधीच या लोकांच्या मध्ये पडू नये, अन्यथा होईल भयंकर नुकसान!

आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यांनी पती-पत्नी यांच्यासह काही लोकांच्या भांडणात कधीच पडू नये, असे सांगितले आहे.

| Updated on: Feb 15, 2026 | 7:51 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलेले आहे. त्यांनी दिलेला सल्ला आणि शिकवण आजदेखील रोजच्या जीवनात उपयोगी पडतो. आचार्य चाणक्य यांनी कोणकोणत्या लोकांच्या मध्ये पडू नये याबाबत सांगितले आहे.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार पती आणि पत्नीच्या भांडणात कधीच पडू नये. दोघांमध्ये कितीही वाद झाला आणि कितीही भांडण झाले तरीदेखील या दोघांच्या भांडणात कधी पडू नये, असे आचार्य चाणक्य सांगतात. कारण कितीही भांडण झाले तरीही पती आणि पत्नी एकत्र येतात. त्यांच्यातील वाद मिटतो.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार दोन तज्ज्ञ, ज्ञानी लोक चर्चा करत असतील तर त्यांच्यात कधीच बोलू नये. सोबतच तुमच्या विषयाशी निगडीत तो विषय नसेल तर तज्ज्ञांच्या मध्ये कधीच बोलू नये. मध्ये बोलल्यास तुम्ही मुर्ख ठरता. तुमची प्रतिमा मलीन होते.

4 / 5
पशू आणि पक्ष्यांचे भांडण सुरू झालेले असेल तर त्यांच्या भांडणात पडू नये. तुम्ही त्यांचे भांडण सोडवायचा प्रयत्न केला तर संबंधित प्राणी तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते. तसेच रागात हल्ला झाल्यामुळे तुमच्या जीवितासही धोका पोहोचू शकतो.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)