
अभिनेता इमरान हाश्मीने मोठा खुलासा केलाय. नुकताच इमरान हाश्मी याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मी हा पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला.

इमरान हाश्मी हा म्हणाला की, माझ्या बोरिंग खाण्यामुळे पत्नी मला थेट सोडून जाण्याची धमकी देत आहे. ती माझ्या खाण्यामुळे वैतागली आहे.

फिटनेस ठेवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा डाएट घ्यावा लागत असल्याचे सांगतानाही इमरान हाश्मी हा दिसतोय. मात्र, यामुळे पत्नी धमकी देत असल्याचे इमरान हाश्मीने म्हटले.

इमरान हाश्मी हा म्हणाला की, मी डाएटच नाही तर वर्कआऊट देखील दररोज करतो. आता इमरान हाश्मी याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

इमरान हाश्मी याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे इमरान हाश्मीची मोठी फाॅलोइंग आहे.