बॉयफ्रेंडचा धोका, 2 वेळा अबॉर्शन, चेहऱ्यात 67 काच… प्रसिद्ध अभिनेत्रीची धक्कादायक स्टोरी, आता कशी जगते?

1999 साली ती दिल क्या करे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा अपघात झाला. या अपघातात तिच्या चेहर्यावर तब्बल 67 काचाचे तुकडे घुसले.

| Updated on: Feb 17, 2026 | 9:17 PM
1 / 5
आज महिमा चौधरी या अभिनेत्रीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. कधीकाळी या अभिनेत्रीने संपूर्ण बॉलिवुडवर राज्य केले. आता मात्र ती लाईमलाईटपासून दूर आहे. कधीकाळी तरुणांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीला मात्र खासगी जीवनात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं.

2 / 5
महिमा चौधरीचा परदेस हा पहिला चित्रपट होता. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. दाग, धडक, कुरुक्षेत्र, बागबान, लज्जा,  दिल क्या करे अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत तिने महत्त्वाची भूमिका केली. जेव्हा महिना करिअर आणि प्रसिद्धीच्या शिखरावर होती, त्याच वेळी त्याच्या आयुष्यात मोठे वादळ आले.

3 / 5
1999 साली ती दिल क्या करे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा अपघात झाला. या अपघातात तिच्या चेहर्यावर तब्बल 67 काचाचे तुकडे घुसले. या दुर्घटनेनंतर पुन्हा सगळं काही सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी गेला आणि तिचे करिअर उद्ध्वस्त झाले.

4 / 5
महिमा चौधरीचा डार्क चॉकलेट हा शेवटचा चित्रपट होता. तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर 2000 साली ती टेनिसपटू लियांडर पेसच्या प्रेमात पडली होती. दोघेही लग्न करणार होते. परंतु लियांडर पेस याचे रिया पिल्लई हिच्यासोबत अफेअर असल्याचे समजताच तिने लियांडरसोबतचे आपले नाते तोडले.

5 / 5
त्यानंतर महिमा चौधरी पुन्हा एकदा आपल्या भावाचा मित्र असलेल्या बॉबी मुखर्जीच्या प्रेमात पडली. या दोघांनी 2006 साली लास वेगास येथे लग्न केले. त्यानंतर 2007 साली दोघांना एक गोड मुलगी झाली. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 साली या दोघांचाही घटस्फोट झाला. बॉबी मुखर्जीसोबत लग्न केल्यानंतर दोन वेळा तिचे मिस कॅरेजही झाले होते.