
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तूफान चर्चेत असणारे एक नाव आहे. आता प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटांनंतर आपला मोर्चा हा थेट हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे.

नुकताच प्रियांका चोप्रा हिने 'द ब्लफ' चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस, मुलगी मालती मेरी आणि मधू चोप्रा दिसत आहेत.

आता द ब्लफ चित्रपटाची शूटिंग संपली आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सेटवर कुटुंबासोबत ती धमाका करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे मुलगी मालती देखील आईच्या सेटवर चांगला वेळ घालवताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. नेहमीच आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालताना प्रियांका चोप्रा ही दिसते.