
सध्या श्रावणाचा पवित्र महिना चालू झाला आहे. या महिन्यात भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. विशेष म्हणजे या महिन्यात महादेवाची पूजा केल्यास ते आपली मनोकामना पूर्ण करतात असेही सांगितले जाते. मात्र भगवान महादेवाची मंदिरातून पूजा करून परतताना चुकूनही काही गोष्टी करू नयेत. या चुका केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळणार नाही, असे बोलले जाते.

महादेवाची पूजा करून परतताना काही गोष्टींची विशेष काळज घेतली पाहिजे. मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजवणे शुभ मानले जाते. मात्र मंदिरातून आल्यानंतर लगेच जेवण करणे टाळावे.

तसेच भगवान महादेवाची मंदिरात पूजा केल्यानंतर घरी परतताना कधीच घंटी वाजवू नये. असे केल्याने मंदिरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे म्हटले जाते. मंदिरात प्रवेश केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

शिवमंदिरात पूजा केल्यानंतर परतताना कधीच मागे फिरून पाहू नये. भक्त मंदिराच्या बाहेर जाताना भगवान महादेवाचे ध्यान पृथ्वीलोकावर नसते. त्यामुळे आपण मागे पाहिल्यास महादेवाचे लक्ष विचलित होते आणि आपल्यावरची कृपादृष्टी कमी होते. त्यामुळेच मंदिरातून बाहेर पडताना कधीच मागे वळून पाहू नये असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.