
अहिल्यानगरच्या एका कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अमित खराडे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

या शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगरच्या एका कॉलेजमध्ये वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडे याने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले. त्यानंतर त्याने त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलवून स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवले.

तसेच हे फोटो तुमच्या विभाग प्रमुखाला दाखवले तर परीक्षेला बसवण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम दिला. यातून मार्ग काढायचा असेल तर माझ्याजवळ बसा असं म्हणत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात हातात घेतला. तसेच शरीरावर लज्जा उत्पन्न होईल असे हात फिरवून विद्यार्थिनींना त्रास देण्यास सुरुवात केली.

प्रातिनिधक फोटो

ही घटना समजतात कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाव घेत नराधम अमित खरडे याला ताब्यात घेतले. अमित खरडे याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 कायद्याच्या 74 व्या कलमांतर्गत तसेच पोक्सो कायद्च्या 8,10,12 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.