
बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर वयाच्या 43 व्या वर्षी सिंगल आहे. हा निर्णय तिने स्वत:साठी घेतला आहे. लग्नाच्या वयावरुन निमरतच्या नातेवाईकांनी नेहमीच तिला टोमणे मारले आहेत.

मी लग्नाच्या प्रश्नांचा सामना केलाय. प्रत्येक मुलीला करावा लागतो. जो पर्यंत मी लंचबॉक्स चित्रपटात काम केलं नव्हतं, तो पर्यंत मला माझे हितचिंतक आणि नातेवाईकांकडून आदर मिळत नव्हता.

माझं काम आणि मला यासाठी गांभीर्याने घेण्यात आलं, कारण त्यात इरफान होता. त्याआधी लोक बोलायचे लग्नाची वेळ झाली. द लंचबॉक्स चित्रपटानंतर लग्नाचे ते प्रश्न बंद झाले.

त्या चित्रपटामुळे नातेवाईकांना माझी क्षमता समजली. त्यांनी माझं कौतुक केलं. जे त्यांना शिकायला मिळालं, त्यामुळे ते हैराण आहेत. म्हणून तुम्ही त्यांना नापसंत करु शकत नाहीत.

लग्न अशी गोष्ट आहे का, ज्यामुळे महिलांमध्ये सेटल झाल्याची भावना येते का? त्यावर निमरत म्हणाली की, "करिअर चांगलं चाललं नसेल. तुम्ही भरपूर पैसे कमवत नसाल, त्यावेळी लोक लग्न करुन सेटल होण्याबद्दल बोलू लागतात"