
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नसोहळ्यात अक्षरश: पाण्यासारखा पैसा वाहिला होता. देशातील सर्वांत महागड्या विवाहसोहळ्यांमध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. या लग्नातील पोशाखापासून ते अंगठीपर्यंत सर्वकाही अत्यंत शाही होतं.

20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नबंधनात अडकले होते. काही वृत्तांनुसार, त्यांच्या लग्नाचा खर्च त्यावेळी सहा ते आठ कोटी रुपये इतका होता. या दोघांच्या लग्नातील पोशाखावर खऱ्या सोन्याची कारागिरी करण्यात आली होती.

ऐश्वर्याने फॅशन डिझायनर नीता लुल्लाने डिझाइन केलेली पारंपरिक गोल्डन कलरची कांजीवरम साडी नेसली होती. या साडीची किंमत तब्बल 75 लाख रुपये असल्याचं म्हटलं गेलंय. तर अभिषेकने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.

मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्याच्या हातावर जी मेहंदी लावण्यात आली होती, ती राजस्थानच्या सोजत इथून मागवण्यात आली होती. लग्नाच्या पाच दिवस आधी 15 किलो मेहंदी मुंबईत पोहोचली होती.

अमिताभ बच्चन हे त्यांच्या मुलाच्या लग्नात खूप खुश होते. याची प्रचिती हा फोटो पाहून येतो. यामध्ये अमिताभ त्यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत वरातीत नाचताना दिसत आहेत. संपूर्ण बच्चन कुटुंबीयांचा थाट पाहण्यासारखा होता.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संगीत कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकत्र डान्स केला होता. 'गुरू' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.