
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील त्यांच्यासोबत घडणाऱ्या अनेक वाईट प्रसंग याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे.

अशातच आता आज साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली ऐश्वर्या राजेश ‘वाडा चेन्नई’सारख्या दमदार चित्रपटांमधील तिच्या प्रभावी अभिनयासाठी ती ओळखली जाते.

मात्र, या यशामागे संघर्ष, मानसिक त्रास आणि कटू अनुभव दडलेला आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये ऐश्वर्या राजेशने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही धक्कादायक अनुभव शेअर करत फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा समोर आणला आहे.

निखिल विजयेंद्र यांच्या ताज्या पॉडकास्टमध्ये बोलताना ऐश्वर्या राजेशने आपल्या आयुष्यातील एक अत्यंत अस्वस्थ करणारी घटना सांगितली. ती खूप लहान असताना एका फोटोशूटसाठी आपल्या भावासोबत गेली होती. मात्र, त्या फोटोशूटदरम्यान फोटोग्राफरने चालाखीने तिच्या भावाला बाहेर पाठवले आणि ऐश्वर्याला एकटी पाडले.

ऐश्वर्याने सांगितले की, एकटी मिळाल्यावर त्या फोटोग्राफरने तिला अंडरवियर घालण्यास सांगितले आणि अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत, 'मला तुझं शरीर पाहायचं आहे,' अशी मागणी केली. त्या वयात ती जवळपास त्याच्या बोलण्याला बळी पडणारच होती मात्र ऐनवेळी तिच्या अंतःकरणाने तिला सावध केले.

या परिस्थितीत ऐश्वर्याने प्रसंगावधान राखत भावाची परवानगी घ्यायची आहे असे कारण सांगून त्या खोलीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचा बचाव केला. हा अनुभव नवोदित अभिनेत्री आणि तरुण मुलींना इंडस्ट्रीमध्ये कोणत्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या धोक्यांना सामोरे जावे लागते याचे गंभीर वास्तव उघड करतो.