
अभिनेता अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटात भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री आमला पॉलने डिलिव्हरीच्या तीन महिन्यांनंतर मुलाचा चेहरा दाखवला आहे. ओनमनिमित्त तिने मुलासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आमलाने 11 जून 2024 रोजी मुलाला जन्म दिला. दुसऱ्या लग्नाच्या दोन महिन्यांतच तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. पती आणि चिमुकल्यासह ओनम साजरा करताना आमलाने हे फोटो पोस्ट केले आहेत.

आमलाने गेल्या वर्षी बॉयफ्रेंड जगत देसाईशी कोचीमध्ये लग्न केलं होतं. याआधी तिने तमिळ दिग्दर्शक ए. एल. विजयसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नव्हतं. घटस्फोटानंतर आमलाने दुसरं लग्न केलं.

आमला पॉल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आमला आणि जगतने त्यांच्या मुलाचं नाव 'इलई' असं ठेवलं आहे.

आमलाने मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. गेल्या वर्षी तिने अजय देवगणच्या 'भोला' या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती दिग्दर्शक ए. एल. विजयच्या प्रेमात पडली होती.