Ajit Pawar Last Rites : अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी शरद पवारांचे मन सुन्न करणारे फोटो

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर आज (गुरुवार, 29 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. शरद पवार याठिकाणी पोहोचले असून त्यांचे नि:शब्द करणारे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Jan 29, 2026 | 10:40 AM
1 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी याठिकाणी प्रचंड गर्दी जमली आहे.

2 / 5
शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचले असून यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नि:शब्द करणारे भाव दिसले. अजित पवार यांच्या निधनाने सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

3 / 5
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. ते काही नुकसान झालं आहे, ते भरून निघणारं नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी बुधवारी दिली.

4 / 5
या अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

5 / 5
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.