Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ सोडा हो, अक्षय खन्ना या चित्रपटाच्या ऑडिशनमध्येच झाला फेल !

Akshaye Khanna Role : काही वर्षांपूर्वी संजय दत्तचा एक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्या चित्रपटात अक्षय खन्ना देखील असणार होता. पण तो ऑडिशनमध्ये नापास झाला आणि त्याला थेट नाकारण्यात आलं.

| Updated on: Jan 02, 2026 | 2:25 PM
1 / 5
Akshaye Khanna Role : अभिनेता अक्षय सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिला चित्रपट म्हणजे प्रचंड यशस्वी ठरलेला "धुरंधर", या चित्रपटामध्ये त्याने रेहमान डैतची साकारलेली भूमिका, ज्याच्या त्याच्या तोंडी अक्षयचंच नाव आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याने नाकारलेला "दृश्यम 3". त्यातून तो बाहेर पडल्यामुळे बरीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली.

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, "धुरंधर" च्या यशानंतर, अक्षयने "दृश्यम 3" च्या निर्मात्यांकडून 21 कोटी रुपयांची फी मागितली होती. एवढंच नव्हे तर त्याने या भागात विग घालण्याची मागणीही केली. मात्र यावर अक्षय आणि मेकर्सचं एकमत झालं नाही आणि अखेर अक्षयने हा चित्रपट सोडला. पण यापूर्वी अक्षयला एका ऑडिशनमुळे एक चित्रपटाला मुकावं लागलं होतं.

3 / 5
ज्या चित्रपटाची इथे चर्चा होता आहे, तो म्हणजे अभिनेता संजय दत्तचा बायोपिक "संजू". तो 2018ल साली प्रदर्शित झाला होता. यात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका केली होती आणि परेश रावल यांनी त्याचे वडील सुनील दत्त यांची भूमिका केली होती.  बऱ्याच जणांना माहीत नसेल पण, अक्षय खन्नालाही सुनील दत्त यांची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

4 / 5
अक्षय खन्नाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की,  या चित्रपटासाठी त्याने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याशी अनेक मीटिंग केल्या होत्या. पण लूक टेस्टमध्ये अक्षय नापास झाला. म्हणजेच तो सुनील दत्तसारखा दिसत नव्हता. त्यामुळे तो भूमिकेसाठी सुटेबल ठरला नाही.

5 / 5
म्हणूनच अक्षय खन्ना याला नकार देण्यात आला.  अखेर परेश रावल यांना सुनील दत्तच्या भूमिकेत कास्ट करण्यात आले. संजू या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात 588 कोटींची कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टरही ठरला.