अंबानी कुटुंब अँटिलियाच्या 27 व्या मजल्यावर का राहते? खुद्द नीता अंबानींनी सांगितलेले कारण

नीता अंबानी यांनी अँटिलिया इमारतीतील २७ व्या मजल्यावर राहण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. नैसर्गिक प्रकाश, ताजी हवा, शांत वातावरण आणि मुंबई शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले हे ठिकाण त्यांना अधिक प्रिय आहे.

| Updated on: May 02, 2025 | 7:53 PM
1 / 10
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणून अंबानी कुटुंबाला ओळखले जाते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात.

2 / 10
त्यासोबतच अंबानी कुटुंबाचे मुंबईतील अँटिलिया हे अलिशान निवासस्थान नेहमीच उत्सुकतेचे केंद्र राहिले आहे.

3 / 10
मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्टामाउंट रोडवर ‘अँटिलिया’ या आलिशान इमारतीत अंबानी कुटुंब राहते. या इमारतीची भव्यता आणि रचना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

4 / 10
४ लाख चौरस फूट क्षेत्रफळ आणि ५७० फूट उंच असलेली अँटिलिया या इमारतीला २७ मजले आहे. यातील प्रत्येक मजल्यावर अत्याधुनिक सुविधा आहेत.

5 / 10
अँटिलिया या इमारतीत २७ मजले असताना अंबानी कुटुंबाने राहण्यासाठी २७ वा मजला का निवडला? या निवडीमागील रहस्य खुद्द नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत उघड केले आहे.

6 / 10
नीता अंबानी यांनी ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यामागील रहस्य सांगितले होते.

7 / 10
आम्ही राहण्यासाठी २७ वा मजला निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा मिळते, असे नीता अंबानी यांनी म्हटले.

8 / 10
तसेच या मजल्यावर मुंबई शहराचा गजबजाट ऐकायला येत नाही. मला शांत वातावरण अधिक आवडते. त्यासोबतच हा मजला उंचीवर असल्याने थंड वारा येतो, असेही नीता अंबानी यांनी सांगितले.

9 / 10
त्यासोबत अरबी समुद्राचे विहंगम दृश्यही पाहायला मिळतेच आणि एक खास प्रकारची शांतता अनुभवायला मिळते, असे नीता अंबानी म्हणाल्या.

10 / 10
हा मजला आमच्या कुटुंबासाठी एका ‘कोकून बबल’सारखा आहे. जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. शांतपणे, एकांतात वेळ घालवतात. या अत्यंत खासगी जागेवर केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक लोकांचीच ये-जा असते, असेही त्यांनी म्हटले.