
टीम इंडियाने रविवारी पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. हरणारा सामना जिंकला. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाच कराव तेवढ कौतुक कमी आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर सर्व बाजीच उलटवली.

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा तोच निकाल लागला, जो याआधी अनेकदा पहायला मिळालाय. टीम इंडिया फक्त एक अपवाद वगळता पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये नेहमीच अजिंक्य ठरलीय.

न्यू यॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

अमेरिकेत पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप होतोय. भारत-पाकिस्तान सामन्याआधीच तिथे वातावरण निर्मिती झाली होती. या सामन्याच्यावेळी अमेरिकेतील स्टेडियम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं होतं.

अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर ड्रेकच लक्ष या सामन्यावर गेलं. त्याने भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठा सट्टा खेळला.

बास्केटबॉलपासून रग्बी आणि फुटबॉल सामन्यावर ड्रेक सट्टा लावण्यासाठी ओळखला जातो. भारताच्या विजयावर त्याने 6,50000 हजार डॉलर म्हणजे 5.42 कोटीचा सट्टा लावला होता.

ड्रेकचा निर्णय चुकीचा नव्हता. टीम इंडियाच्या विजयामुळे त्याने 9,10000 डॉलर म्हणजे 7.59 कोटी रुपये कमावले. म्हणजे 2.17 कोटीचा फायदा.

याआधी मागच्या महिन्या ड्रेकने आयपीएल फायनलवर सट्टा लावला होता. तिथेही KKR च्या विजयामुळे त्याला 1.7 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.