
युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनच्या एका टीमचे पुरतत्त्ववेत्ता अर्लेन चेस आणि डायने चेस यांनी एक प्राचीन शहर वसवणाऱ्या राजाचे समाधी शोधून काढले आहे. या सम्राटाचे नाव तेक आब चाक असे असून त्याने साधारण 1600 वर्षांपूर्वी प्राचीन माया सभ्यता असलेले एक शहर वसवले होते. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

यूनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टननेच या शोधाची घोषणा केली आहे. अर्लेन चेस आणि डायने चेस हे गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या भागात खोदकाम करत होते. आता त्यांना या भागात राजा तेक आब चाक याचे समाधीस्थळ सापडले आहे. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

या समाधीस्थळावर तेक आब चाक याच्या शाही आयुष्याची झलक दाखवणाऱ्या काही वस्तू भेटल्या आहेत. यामध्ये नक्षीकाम केलेली हाडं. समुद्रशिंपले, डेथ मास्क, मातीची भांडी, मोती अशा वस्तूंचा समावेश आहे. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

कारकोल शहर हे सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये माया सभ्यतेचे एक प्रमुख केंद्र होते, असे बोलले जाते. या शहरात कधीकाळी 10 हजारापेक्षा अधिक लोकांचे घर होते असेही सांगितले जाते. मात्र 900 इसवी सनापर्यंत माया सभ्यतेच्या शहरांप्रमाणे हेदेखील शहर नष्ट झाले. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)

बेलीझच्या कायो जिल्ह्यातील पर्वतीय जंगलात या शहराची काही अवशेष अजूनही पाहायला मिळतात. कारकोल या शहरात शेती केली जायची. या शहरात विशाल रस्ते होते. आलिशान इमारती होत्या. 140 फूट उंचीचा पिरॅमिडही येथे होता. (Photo Credit- X account- @PlayaRiviera)