
अभिनेता अर्जुन कपूरचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच त्याला गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या घराजवळ पाहिलं गेलंय. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.

रविवारी सकाळी अर्जुन कपूरला मलायकाच्या घराजवळ पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. अर्जुन ऑल ब्लॅक लूकमध्ये मलायकाच्या घरी पोहोचला होता. त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गो जीन्स परिधान केली होती.

अर्जुनला मलायकाच्या घरी पाहिल्यानंतर लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अर्जुनच्या या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी मलायकाची बहीण अमृता अरोरासुद्धा उपस्थित होती.

ईस्टर संडेनिमित्त मलायकाच्या आईच्या घरी सर्वजण एकत्र जमले होते. मात्र अर्जुन आणि मलायका त्यांच्या लग्नाचाही गंभीर विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे.

मलायका अर्जुनला गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.