
आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो माला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला.


बीड जिल्ह्याच्या गैरवाई तालूक्यातील रुई येथील नवले दांपत्याला यंदा मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला. मुरलीधर नवले आणि जिजाबाई नवले हे शेतकरी दांपत्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी वारीत आले आहेत.