PHOTO : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना झटका, SMS अलर्टसाठी कटणार पैसे!

| Updated on: Jul 01, 2021 | 11:14 AM

अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या बचत खातेधारकांसाठी अनेक सेवा शुल्कामध्ये वाढ केली आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 1 जुलैपासून एसएमएस अलर्ट सर्व्हिस शुल्क वाढवले आहे. अर्ध-शहरी भागात पूर्वी प्राइम अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना किमान मुदत ठेव 15,000 किंवा 1 लाख रुपये टर्म डिपॉझिट ठेवणे आवश्यक होते.

1 / 5
अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या बचत खातेधारकांसाठी अनेक सेवा शुल्कामध्ये वाढ केली आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 1 जुलैपासून एसएमएस अलर्ट सर्व्हिस शुल्क वाढवले आहे. अर्ध-शहरी भागात पूर्वी प्राइम अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना किमान मुदत ठेव 15,000 किंवा 1 लाख रुपये टर्म डिपॉझिट ठेवणे आवश्यक होते. आता यामध्ये वाढ करीत 25,000 रुपये किंवा मुदत ठेव 1 लाख रुपये करण्यात आली आहे.

2 / 5
अ‍ॅक्सिस बँकेत एसएमएस शुल्क अगोदर दरमहा 5 रुपये आकारत होती. मात्र, आता 1 जुलैपासून याची किंमत प्रति एसएमएस 25 पैसे लागणार आहेत. पण कोणत्याही एका महिन्यात 25 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. यात ओटीपीसाठी ग्राहकांना पाठविलेले एसएमएस किंवा प्रोमोशनल एसएमएसचा समावेश नसेल.

3 / 5
अ‍ॅक्सिस बँकेने प्राइम व्हेरिएंट खात्यासाठी किमान शिल्लक मर्यादा सुधारीत करीत 25,000 रुपये किंवा किमान 1 लाख रुपये मुदत ठेव केली आहे. प्राईम व्हेरिएंट बँक खात्यांमध्ये डिजिटल प्राईम, सेव्हिंग्ज डोमेस्टिक आणि नॉन-रेसिडेन्ट प्राईम आणि लिबर्टी स्कीमच्या खात्यांचा समावेश असेल.

4 / 5
बँकेने एटीएममधून मोफत मर्यादेनंतर पैसे काढण्यासाठी कमीतकमी शिल्लक शुल्कही वाढविले आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सुरू केलेल्या नव्या व्यवस्थेनंतर बँकेने एसएमएस शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

5 / 5
अ‍ॅक्सिस बँकेने गेल्या महिन्याभरापासून किमान शिल्लक, रोख पैसे काढणे यासारख्या अनेक बँकिंग सेवांवरील शुल्क वाढविले आहे. अ‍ॅक्सिस बँकेने सुलभ बचत योजना असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम 10000 रुपयांवरून 15000 रुपयांपर्यंत वाढविली आहे.