58 मिनिटांचा ‘तो’ अल्बम, 6 गायक अन् 8 गाणी; 1993 मध्ये सर्वाधिक विकला गेला, आजही आहे लोकप्रिय!
हा चित्रपट 1993 मध्ये बॉक्स ऑफिसवर गाजलाच, पण त्याचा म्युझिक अल्बमही तितकाच लोकप्रिय ठरला. जवळपास 58 मिनिटांच्या या अल्बममध्ये 8 गाणी होती. अनु मलिक यांच्या संगीताने सजलेल्या या अल्बमच्या जवळपास 1 कोटी युनिट्स विकल्या गेल्याचे सांगितले जाते. कोणता आहे हा चित्रपट आणि त्यातील गाणी जाणून घ्या एका क्लीकवर

वेड्या प्रेमाची कहाणी, बदल्याची आग आणि दोन बहिणींच्या आयुष्याभोवती फिरणारा ‘बाजीगर’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 1993 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर त्याच्या गाण्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बाजीगर’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने एका वेगळ्याच प्रकारची भूमिका साकारली होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो एका कुटुंबात प्रवेश करतो आणि आपल्या उद्दिष्टासाठी अनेक कठोर निर्णय घेतो. अब्बास-मस्तान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला.
चित्रपटाच्या यशात त्याच्या संगीताचाही मोठा वाटा होता. जवळपास 58 मिनिटांच्या या म्युझिक अल्बममध्ये 8 गाणी होती. विशेष म्हणजे ही गाणी वेगवेगळ्या गायकांनी गायली होती आणि जवळपास प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. 1993 मध्ये सर्वाधिक विकला गेलेला म्युझिक अल्बम ‘बाजीगर’च्या संगीताची जबाबदारी संगीतकार अनु मलिक यांनी सांभाळली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.
या म्युझिक अल्बमच्या जवळपास 1 कोटी युनिट्सची विक्री झाली होती. त्यामुळे 1993 मधील हा सर्वाधिक विकला गेलेला बॉलिवूड म्युझिक अल्बम ठरला. या संगीतामुळे अनु मलिक यांच्या कारकिर्दीलाही मोठी झेप मिळाली. ‘बाजीगर’च्या संगीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
8 गाणी आणि आठही सुपरहिट, ‘बाजीगर’च्या अल्बममध्ये एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी होती. ‘बाजीगर ओ बाजीगर’ या गाण्याने चित्रपटातील भावनिक वातावरण आणि शाहरुखच्या व्यक्तिरेखेतील वेदना प्रभावीपणे मांडल्या. तर ‘ये काली काली आँखें’ हे गाणं आजही 90च्या दशकातील लोकप्रिय डान्स आणि पार्टी साँग म्हणून ओळखलं जातं.
याशिवाय ‘ऐ मेरे हमसफर’ आणि ‘छुपाना भी नहीं आता’ या गाण्यांनाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. या संपूर्ण अल्बममध्ये प्रेम, विरह, दुःख आणि मस्ती अशा वेगवेगळ्या भावना ऐकायला मिळाल्या. याच कारणामुळे ‘बाजीगर’चा म्युझिक अल्बम 90च्या दशकातील सर्वाधिक गाजलेल्या अल्बमपैकी एक ठरला आणि आजही त्यातील गाणी चाहत्यांच्या आठवणीत आहेत.