Baba Vanga Predictions : ज्याची भीती होती तेच झालं; बाबा वेंगांची धडकी भरवणारी भविष्यवाणी, HMPV आजाराबाबत बाबा वेंगांनी आधीच सांगितलं होतं?
बाबा वेंगा या देखील एक जगप्रसिद्ध भविष्यकार होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला. एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली असं मानलं जातं. मात्र त्यांनी हयात असताना ज्या काही भविष्यवाणी केल्या त्यातील अनेक भविष्यवाणी आज खऱ्या ठरत आहेत, असा दावा केला जातो.

नवं वर्ष सुरू झालं आहे, नव्या वर्षात एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा धोका वाढला आहे, या आजाराचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, आता भारतात देखील या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांनी ज्या आजाराबाबत भाकीत वर्तवलं आहे तो आजार म्हणजे एचएमपीव्ही तर नाहीना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
- नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, नव्या वर्षामध्ये आपण अनेक स्वप्न पाहातो, नव्या वर्षाकडून आपल्या अनेक अपेक्षा असतात. नवं वर्ष आपल्याला कसं जाणार, कोणत्या घटना आपल्यासोबत घडणार आहेत? याबाबत आपल्याला प्रचंड उत्सुकता असते.
- नवीन वर्ष कसं जाणार? हे जाणून घेण्यासाठी आपण अनेकदा ज्योतिषाकडे जातो. ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे, असे लोक नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी ज्योतिषाने सांगितलेले उपाय देखील करतात.
- बाबा वेंगा या देखील एक जगप्रसिद्ध भविष्यकार होत्या, त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला. एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली असं मानलं जातं. मात्र त्यांनी हयात असताना ज्या काही भविष्यवाणी केल्या त्यातील अनेक भविष्यवाणी आज खऱ्या ठरत आहेत, असा दावा केला जातो.
- अमेरिकेवर झालेला हल्ला, कोरोनाची करण्यात आलेली भविष्यवाणी, हिटलरचा मृत्यू अशा काही भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत.
- दरम्यान 2025 हे वर्ष जगाला म्हणावं तसं चांगलं जाणार नाही, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जगाच्या अंताची ही सुरुवात असणार आहे, असंही बाब वेंगा यांनी म्हटलं आहे. युरोपीयन देशांमध्ये युद्ध होईल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
- बाबा वेंगा यांनी असंही म्हटलं की, 2025 मध्ये देखील एखाद्या मोठा आजाराच्या साथीचा सामना जगाला करावा लागू शकतो. याचा प्रसार हा आशिया खंडातील एका देशामधून होईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती.
- नवं वर्ष सुरू झालं आहे, नव्या वर्षात एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचा धोका वाढला आहे, या आजाराचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असून, आता भारतात देखील या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाबा वेंगा यांनी ज्या आजाराबाबत भाकीत वर्तवलं आहे तो आजार म्हणजे एचएमपीव्ही तर नाहीना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)







