
जगभरात असंख्य लोक मांसाहार आवडीने खातात. काहींना समुद्री खाद्यपदार्थ म्हणजेच मासे, काहींना चिकन तर काहींना मटण आवडतं. विविध प्रदेशातील लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खातात. पण बलुचिस्तानमध्ये कोणतं मांस सर्वाधिक खाल्लं जातं, हे तुम्हाला माहीत आहे का?

पाकिस्तानपासून वेगळं होण्याच्या मागणीमुळे बलुचिस्तान नेहमीच चर्चेत असतो. बलुचिस्तानमध्ये मटण सर्वाधिक खाल्लं जाणारं मांस आहे. खासप्रसंगी मटणाचे विविध पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा आस्वाद घेतला जातो.

बलुचिस्तानमधील बहुतांश लोकांना बकरीचं मांस म्हणजेच मटण खायला आवडतं. तिथे मटण सहजरित्या उपलब्ध असतं. त्यामुळे दररोजच्या जेवणातही ते मटणाचा समावेश करतात.

तिथल्या वाळवंटी आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी उंटाचंही मांस खाल्लं जातं. परंतु त्याचा रोजच्या आहारात समावेश नसतो. असं असलं तरी ते पारंपरिक आहाराचा एक भाग आहे.

बलुचिस्तानमध्ये गोमांसही खाल्लं जातं असं म्हटलं जातं. परंतु ते मटक किंवा बकरीच्या मांसाच्या तुलनेत कमी खाल्लं जातं. तर किनारी भागात राहणाऱ्या लोकांच्या आहारात मासे अधिक पहायला मिळतात.

बलुचिस्तानमध्ये हळूहळू चिकनची लोकप्रियता वाढू लागली आहे. परंतु बहुतांश लोकसंख्येला चिकनऐवजी लाल मांसच अधिक आवडतं. त्यामुळे ते मटणाला प्राधान्य देतात.

बलुचिस्तानमध्ये सज्जी आणि रोश यांसारखे मांसाचे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. हे पदार्थ मटणापासूनच बनवले जातात. तिथे प्रामुख्याने मांसाहार केला जातो.