Health : उन्हाळ्यात मुळा खाण्याचे आहेत ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

मुळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच मुळा ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

| Updated on: Jun 15, 2023 | 11:26 PM
1 / 5
कच्च्या फळभाज्यांचा आहारात समावेश करणं आरोग्यास खूप फायदेशीर ठरतं. यामध्ये मग टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा यासारख्या फळभाज्या खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. तर आज आपण मुळ्याबाबत जाणून घेणार आहोत जो खूपच फायदेशीर आहे. तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही मुळा खाऊ शकता. तर आता आपण मुळ्याच्या फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.

2 / 5
मुळा ही अशी फळभाजी आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात ही भाजी खाणं खूप फायदेशीर ठरतं. मुळा खाल्ल्यानं आपलं शरीर हायड्रेट राहतं.

3 / 5
मुळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. सोबतच तो फ्री रेडिकलमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतो.

4 / 5
मुळा खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते तसेच मुळा ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे तुम्ही मुळ्याचा समावेश तुमच्या आहारात सॅलडच्या स्वरूपात करू शकता.

5 / 5
मुळ्यात अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइडचे प्रमाण चांगले असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. तसंच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही मुळा फायदेशीर आहे. सोबतच मुळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते.