
रक्ताची कमतरता भरून काढते : भेंडीमध्ये लोह (Iron) मुबलक प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.

गर्भधारणेदरम्यान उपयुक्त: भेंडीमध्ये फोलेट (Folate) भरपूर प्रमाणात असते, जे गर्भवती महिलांसाठी गर्भाच्या योग्य वाढीसाठी उपयुक्त आहे.

हाडे मजबूत करते: भेंडीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे महिलांचे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर: यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला उजळ व निरोगी ठेवण्यास मदत करतात. भेंडीच्या सेवनामुळे हार्मोनल बॅलन्स सुधारतो आणि मासिक पाळी नियमित होण्यास मदत मिळते.

भेंडीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. भेंडीमध्ये असलेले घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जे महिलांसाठी विशेषतः उपयुक्त आहे.