
सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांनी काही चित्रपटांमध्ये धमाका देखील केलाय.

सलमान खानने एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याच्याबद्दलचा मोठा किस्सा सांगितला. सलमान खान म्हणाला की, आमची करण अर्जुन चित्रपटाची शूटिंग सुरू होती.

शूटिंगच्या सेटवर माझा भाऊ सोहेल खान हा आला. तो तिथेच थांबवा. यामुळे मला शाहरुख खान याच्यासोबत बेड शेअर करण्याची वेळ आली. आमच्या अगोदर शाहरुख खान झोपला.

माझ्या शेजारी शाहरुख खान हा घुरत होता. यामुळे मला अजिबातच झोप लागत नव्हती. मी थेट शाहरुख खानला लाथ मारत बेडवरून खाली पाडले.

शाहरुख खान आणि आम्ही त्यावेळी खूप हसलो. शाहरुख खान हा शेवटी डंकी या चित्रपटात दिसला. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाने चांगला धमाका देखील केला.