
काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार अभिनेय करत चाहत्यांना घायाळ केलं. आज अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, स्टाईलमुळे कायम चर्चेत असते.

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये काजोल सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. काजोलचे असे काही लूक आहेत जे तुम्ही देखील फॉलो करु शकता.

वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडत आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते आणि फॅशन गोल्स देते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक महिला काजोल हिचे नवीन लूक पाहून अभिनेत्रीला फॉलो करतात.

90 च्या दशकात तर फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्रीचा बोलबाला होता. अभिनेत्रीचे सिनेमातील लूक देखील प्रचंड पसंतीस उतरले होते.